वूमंस वेल्फेअर फोरम WWF चा वर्धापन दिनी कोमल घाग यांना राज्य व्यापी पर्यावरण स्नेही पुरस्कार
मुंबई: सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत 25 वर्षे पूर्ण करणाऱ्या WWF या संस्थेने विविध क्षेत्रात कार्यरत कर्तृत्ववान महिलांचा दादर माटुंगा कलचरल सेंटर मध्ये मानपत्र आणि स्मृतिचन्ह देवून सन्मान सोहळा आयोजित केला होता.
यावेळी उपस्थित प्रमुख वक्त्या श्रीमती ज्योती ठाकरे,अध्यक्षा.महिला आर्थिक विकास महामंडळ, डॉ.सारिका पाटील,वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी नायर रुग्णालय, डॉ.शांताराम कारंडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
श्रीमती ज्योती ठाकरे यांनी उपस्थित मान्यवर महिलांचे अभिनंदन तर केलेच परंतु स्वतः ला सिद्ध करण्यासाठी माविम बरोबर जोडल्या जाण्याचे व सक्षम महिला सबलीकरणाच्या कर्तृत्वाचा पाढाच वाचला.
अतिशय थाटामाटात पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यात **संगम प्रतिष्ठानच्या मानद सचिव कोमल तानाजी घाग यांना राज्य स्तरीय पर्यावरण स्नेही पुरस्काराने गौवण्यात आले*
यावेळी पर्यावरण सव्हर्धनासाठी आणि कचरावेचक समाजाच्या कल्याणकारी योजनांसाठी काम करणाऱ्या अनेक सेवाभावी संस्थांच्या मदतीने शासन दरबारी संगम प्रतिष्ठान या पुढे कार्यरत राहील अशी ग्वाही कोमल घाग यांनी दिली.