चेंबूर घाटला‌ येथे 'माझी मुंबई स्वच्छ मुंबई' अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

चेंबूर घाटला‌ येथे 'माझी मुंबई स्वच्छ मुंबई' अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद


सांगली जिल्हा विकास संघाचे अध्यक्ष संभाजी लोखंडे यांच्या पुढाकाराने कार्यक्रम यशस्वी



ग्लोबल चक्र न्यूज

मुंबई: मुंबई महानगरपालिका एम - पश्चिम विभाग चेंबूर‌‌ सहाय्यक आयुक्त ‌श्री विश्वास मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली, धनकचरा विभागातील अधिकारी, श्री दिपक मदने, श्री मगदुम , हरिश्चंद्र कोळेकर साहेब, कविता बनसोडे मॅडम यांच्या उपस्थितीत  चेंबूर घाटला‌ येथे 'माझी मुंबई स्वच्छ मुंबई' अभियान राबविण्यात आले.

आपला परिसर स्वच्छ ठेवणे हे प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे म्हणून या स्वच्छ मुंबई ‌अभियाना मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे याकरिता घाटला खारदेव नगर, वैभव नगर‌, मारथोमा हायस्कूल, संजीवनी सोसायटी या परिसरा मध्ये एका रैली चे आयोजन करण्यात आले होते. या स्व:च्छ मुंबई अभियाना मध्ये गोवंडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुदर्शन होनवडजकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्री तानाजी रोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री वारे, उपनिरीक्षक श्री ज्ञानु अष्टक, पोलीस उपनिरीक्षक जयश्री देवडेकर व‌ इतर पोलीस अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच प्लस पॉइंट हायस्कूल चे विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक सुध्दा सहभागी झाले होते.

स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी सांगली जिल्हा विकास संघाचे अध्यक्ष संभाजी लोखंडे, महिला संघटक कांचन माने, बबन जाधव, जगन्नाथ कांबळे, अर्थव कवळे, आशिष पडळकर, इसताक शहा, चेतन घोरपडे, नबी शेख, राजेश्री पवार,‌ विक्रम म्हात्रे,  सुनील साळवे  व त्यांचे सहकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होऊन विशेष मेहनत घेत होते.

कार्यक्रमानंतर युवा समाजसेवक शुभम संभाजी लोखंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.



Most Popular News of this Week

सिडको विकसित शहर के नागरिक...

सिडको विकसित शहर के नागरिक टैंकरों से पानी खरीदने को मजबूरपनवेल। पनवेल के...

पानी की समस्या से उलवे के...

पानी की समस्या से उलवे के नागरिकों को मिलेगा समाधाननवी मुंबई। गर्मी सुरु हो...

बिजली बार- बार जाने से नागरिक...

बिजली बार- बार जाने से नागरिक परेशान,गुस्साई जनता का मॅफको कार्यालय के...

इंडियन नेवी से रिटायर्ड कर्मी...

इंडियन नेवी से रिटायर्ड कर्मी के साथ 2 करोड़ 47 लाख की ठगीनवी मुंबई। शेयर बाजार...

चुनाव की दृष्टि से काम पर लगे-...

चुनाव की दृष्टि से काम पर लगे- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का विजय नाहटा को...

चिकित्सा क्षेत्र में पर्यटन...

चिकित्सा क्षेत्र में पर्यटन बढ़ाने के लिए पनवेल मनपा की पहलपनवेल।...