हैडलाइन

दादरमध्ये रंगणार दिवाळी संध्या -दादरच्या दिग्गजांना कलाकारांची स्वरांजली -खासदार राहुल शेवाळे यांच्या वतीने आयोजन

दादरमध्ये रंगणार दिवाळी संध्या

दादरच्या दिग्गजांना कलाकारांची स्वरांजली

खासदार राहुल शेवाळे यांच्या वतीने आयोजन


मुंबई : मुंबई शहरातील दादर परिसरात गेल्या काही दशकांमध्ये घडलेल्या दिग्गजांचा सन्मान करणारी दिवाळी संध्या छत्रपती शिवाजी पार्क समोरील महात्मा गांधी जलतरण तलाव येथे आयोजित करण्यात आली आहे. शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात दादरचा समृध्द सांस्कृतिक इतिहास अधोरेखित केला जाणार आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजता रसिकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे.  


 खासदार राहुल शेवाळे यांच्यासह मर्क्युरी इव्हेंट आणि मनसा यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रसिद्ध संगीतकार  कमलेश भडकमकर करणार असून  उत्तरा केळकर, स्वप्निल बांदोडकर, मुग्धा वैशंपायन, स्वरा जोशी,अजित परब, शरयू दाते, शाल्मली सुखटणकर, मयूर सूकाळे, आर्चिस लेले, वरद कठापूरकर, सत्यजित पाध्ये, सीमा देशमुख असे नावाजलेले कलाकार यात सहभागी होणार आहेत. दादरमध्ये घडलेले दिग्गज कलाकार आणि त्यांचा सांगीतिक प्रवास अधोरेखित करणारा हा कार्यक्रम दादरच्या रसिकांसाठी विनामूल्य असून त्यासाठी मोफत प्रवेशिका वितरित करण्यात आल्या आहेत.


Most Popular News of this Week

विद्याविहार रेल्वे...

घाटकोपर परिसरातील पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील...

वडाला में कांग्रेस ने मनाया...

मुंबई के वडाला रेलवे स्टेशन के बाहर कांग्रेस की ओर से ‘लोकतंत्र का काला...

बिग बॉस फेम डोनल बिष्ट की...

चेम्बूर जिमखाना ने क्रिकेट होम टूर्नामेंट 2026 की ऑफिशयल घोषणा कर दी है....

मंत्री छगन भुजबळ व माजी...

सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी,...

विद्याविहार ईस्ट-वेस्ट...

बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारा नवनिर्मित विद्याविहार ईस्ट-वेस्ट कनेक्टर...

ज्ञानेश कुमार राजीनामा द्या,...

ज्ञानेश कुमार यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाचा जो भ्रष्ट कारभार सुरू...