हैडलाइन

हनुमान जन्मोत्सव: मुंबईतील पालखी सोहळे, मिरणुका, जत्रोत्सवात मिहिर कोटेचा यांचा सहभाग

हनुमान जन्मोत्सव:

मुंबईतील पालखी सोहळे, मिरणुका, जत्रोत्सवात मिहिर कोटेचा यांचा सहभाग

●ग्लोबल चक्र न्यूज डेस्क 

मुंबई:  हनुमान जन्मोत्सवानिमित्त ईशान्य मुंबईत(मुंबई उत्तर पूर्व) आयोजित जत्रोत्सव, पालखी सोहळे, मिरवणुकांमध्ये महायुतीचे उमेदवार मिहिर कोटीचा यांनी आशीर्वाद घेतले. बजरंग बली की जय असा जयघोष करत कोटेचा यांनी भगवान श्रीरामांचे परमभक्त हनुमानजी यांचे आशीर्वाद घेतले.

कोटेचा यांनी दिवसाची सुरुवात मुलुंड पूर्वेकडील हनुमान चौकातील हनुमान मंदिर, रोकडीया हनुमान मंदीरात दर्शन घेत केली. भगवान श्रीरामांचे परमभक्त हनुमानजी यांची विधिवत पूजा करून कोटेचा आपल्या कार्यकर्त्यांसह घाटकोपर येथील देरासर लेन,  मानखुर्द, बैगन वाडी येथील जयबजरंग सेवा मंडळाने आयोजित केलेल्या पुजा व महाप्रसाद कार्यक्रमात सहभाग घेतला. संध्याकाळी मुलुंड कॉलनी येथील हनुमान मंदिर ट्रस्टने हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या महाआरती, मिरवणुकीत कोटेचा सहभागी झाले.  त्यानंतर ते मुलुंड पश्चिमेकडील श्री नर्मदादेवी मित्र मंडळाने अंबाजी धाम जवळ आयोजित केलेल्या भव्य जत्रोत्सव, पालखी सोहळ्यात सहभागी झाले.



Most Popular News of this Week

काँग्रेस कार्यालयात घुसून...

आदिवासी विद्यार्थी मागील ४८ दिवसांपासून आंदोलन करत आहेत, नाशिकमधून...

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या...

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक...

आदिती तटकरे व राजोल पाटील...

शब्दांच्या कुंचल्यातून मानवी भावना, नात्यांचे पदर आणि प्रेमाची हळवी...

आमदार पंकज भुजबळ यांच्या...

जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या...

हिंदी पूरे देश में संपर्क की...

हिंदी देशभर में लोगों के बीच संवाद का माध्यम बन रही है। स्थानीय भाषाओं का...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...

 पावसातील खंड आणि अपुऱ्या पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी...