हैडलाइन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते सलमान खान यांच्या मुख्य उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ सोहळा साजरा

 टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया (ITCSF) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “President Cup India - 2026” या देशव्यापी टेनिस क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ आज, गुरुवार ३१ मार्च २०२६ रोजी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे मोठ्या दिमाखात पार पडला. या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते, सुपरस्टार सलमान खान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मैदानात हजारो क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.

                   

टेनिस क्रिकेटपटूना एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा भारतात विविध देशांमध्ये वर्षातून तीन वेळा आयोजित केली जाईल अशी घोषणा यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि आयटीसीएसएफचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी खेळाडूंनी एकच जल्लोष करत या निर्णयाचे स्वागत केले.


यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना या उपक्रमाचे कौतुक केले. तर अशा पद्धतीचे उपक्रम आयोजित होणे गरजेचे असल्याचे मत यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम मैदानाच्या विकासाठी आजवर ५५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची त्यांनी यावेळी सांगितले. तर यावेळी अनेक वर्षानी आपण ठाण्यात आलो आहोत. ठाण्यात येऊन खूप उत्तम वाटले. आज ठाणे हे बांद्र्या पेक्षा ही अधिक उत्तम दिसू लागले असल्याचे अभिनेते सलमान खान यांनी सांगितले. 


टेनिस क्रिकेट खेळाडूंना अधिक चांगले व्यासपीठ मिळावे. आर्थिक दृष्टया देखील आपली आवड जोपासण्यासाठी मनोबल मिळावे आणि अधिक उत्तम क्रिकेट खेळता यावे यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच याच हेतून स्पर्धेची विजेती रक्कम देखील १ कोटी करण्यात आली असल्याचे ही खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आज 31 मार्च रोजी महाराष्ट्र वॉरियर्स विरुद्ध कर्नाटक रॉयल किंग्स हा पहिला सामना पार पडला. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ते टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया (ITCSF) चे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली टेनिस क्रिकेटला राष्ट्रीय स्तरावर संघटित व व्यावसायिक ओळख मिळवून देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे.आयटीसीएसएफच्या माध्यमातून देशभरातील टेनिस क्रिकेट खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेची सुरुवात करण्यात येत आहे. आज ३१ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत देशातील विविध राज्यांतील १६ संघांमध्ये ही स्पर्धा रंगणार असून, मोठ्या संख्येने खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. ‘President Cup India’ स्पर्धेची बक्षीस रक्कम ४० लाखांवरून थेट १ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय आयटीसीएसएफने घेतला आहे. 


टेनिस क्रिकेट हा सर्वसामान्य तरुणांचा खेळ असून, ग्रामीण व शहरी भागातील अनेक प्रतिभावान खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची ही सुवर्णसंधी ठरणार आहे. उद्घाटन सोहळ्याला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, विविध संघांचे खेळाडू तसेच मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी उपस्थित राहणार असून, प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे.यावेळी मंत्री उदय सामंत, प्रताप सरनाईक, खासदार श्रीरंग बारणे, नरेश म्हस्के, डॉ.ज्योती वाघमारे, ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सूनंदन लेले यांच्यासह सर्व संघाचे अध्यक्ष, खेळाडू आणि मान्यवर मंडळी उपस्थित होते.या स्पर्धेत महाराष्ट्र वॉरियर्स, पुणे पायराइट्स, बिहार ब्लास्टर्स, दिल्ली स्ट्राइकर्स, ड्रीम हरियाणा रॉयल्स, गुजरात लायन्स, कर्नाटक रॉयल किंग्स, केरळ वॉरियर्स, कोलकाता रायडर्स (वेस्ट बंगाल), मध्य प्रदेश टायगर्स, पूर्वांचल पँथर्स, राजस्थानी योद्धाज, रॉयल चॅलेंजर्स गोवा, सुप्रीम सुपर किंग्स (तमिळनाडू), यूपी नाइट्स आणि उत्तराखंड टायगर्स असे एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत. विजेत्या संघाला १ कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असून, स्पर्धेत कोट्यवधी रुपयांची बक्षिसे वितरित केली जाणार आहेत.स्पर्धेतील विजेत्या संघाला तब्बल १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले असून, उपविजेत्या संघाला ५० लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. टेनिस क्रिकेट क्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावर बक्षिसे जाहीर होणे ही विशेष बाब मानली जात आहे. याशिवाय, स्पर्धेतील वैयक्तिक कामगिरीलाही विशेष प्रोत्साहन देण्यात आले आहे. सर्वोत्तम फलंदाज, सर्वोत्तम गोलंदाज तसेच २३ वर्षांखालील उदयोन्मुख खेळाडू यांना प्रत्येकी आकर्षक बाईक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूस “मॅन ऑफ द सिरीज” म्हणून भव्य महिंद्रा थार ही चारचाकी गाडी प्रदान करण्यात येणार आहे.दरम्यान, प्रत्येक सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठी “मॅन ऑफ द मॅच” हा पुरस्कार ठेवण्यात आला असून, त्यासाठी दररोज ५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक व आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत.स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांसाठी ठेवण्यात आलेली बक्षिसे. लकी ड्रॉच्या माध्यमातून तीन इलेक्ट्रिक बाईक्स जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक सामन्यानंतर १० हजार रुपयांचे रोख बक्षीस आणि १० हजार रुपयांचे रिटेल व्हाउचर्स देण्यात येणार आहेत. 

  

१ एप्रिल रोजी दुपारी १२:३० वाजता महाराष्ट्र वॉरियर्स विरुद्ध मध्यप्रदेश टायगर्स सामना होईल. २:१० वाजता कर्नाटक रॉयल किंग्स आणि गुजरात लायन्स यांच्यात लढत होणार आहे. ३:५० वाजता कोलकाता रायडर्स आणि बिहार ब्लास्टर्स यांच्यात सामना रंगेल. संध्याकाळी ५:३० वाजता ड्रीम हरियाणा रॉयल्स विरुद्ध दिल्ली स्ट्रायकर्स सामना होईल. रात्री ७:१० वाजता बिहार ब्लास्टर्स आणि दिल्ली स्ट्रायकर्स, ८:५० वाजता कोलकाता रायडर्स आणि ड्रीम हरियाणा रॉयल्स, १०:३० वाजता कोलकाता रायडर्स आणि दिल्ली स्ट्रायकर्स, तर मध्यरात्री १२ वाजता बिहार ब्लास्टर्स आणि ड्रीम हरियाणा रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे.

२ एप्रिल रोजी तिसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजता महाराष्ट्र झोन-२ आणि रॉयल चॅलेंजर्स गोवा यांच्यात सामना खेळवला जाईल. ४:४० वाजता पूर्वांचल पँथर्स आणि सुप्रीम सुपर किंग्स तमिळनाडू आमनेसामने येतील. ६:२० वाजता सुप्रीम सुपर किंग्स तमिळनाडू आणि रॉयल चॅलेंजर्स गोवा यांच्यात सामना होईल. रात्री ८ वाजता पूर्वांचल पँथर्स आणि महाराष्ट्र झोन-२ यांच्यात लढत होईल. ९:३० वाजता पूर्वांचल पँथर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स गोवा, तर ११:२० वाजता सुप्रीम सुपर किंग्स तमिळनाडू आणि महाराष्ट्र झोन-२ यांच्यात दिवसाचा शेवटचा सामना होणार आहे.

३ एप्रिल रोजी चौथ्या दिवशी दुपारी ३ वाजता उत्तराखंड टायगर्स आणि केरळ वॉरियर्स यांच्यात सामना होईल. ४:४० वाजता राजस्थान योद्धाज आणि यूपी नाईट्स यांच्यात सामना रंगेल. ६:२० वाजता केरळ वॉरियर्स आणि यूपी नाईट्स, रात्री ८ वाजता उत्तराखंड टायगर्स आणि राजस्थान योद्धाज यांच्यात सामना होईल. ९:३० वाजता उत्तराखंड टायगर्स आणि यूपी नाईट्स, तर ११:२० वाजता केरळ वॉरियर्स आणि राजस्थान योद्धाज यांच्यात दिवसाचा शेवटचा सामना खेळवला जाईल. यानंतर उपांत्यपूर्व फेरी आणि उपांत्य फेरी सामने आणि ५ एप्रिल रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे.




Most Popular News of this Week

ठाकरेंचा मोर्चा, देशभर...

 वाशी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

मोदी सरकार विरोधात शिवाजी...

केंद्र व राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार, निवडणूक आयोगाच्या पक्षपाती...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

स्वातंत्र्यसैनिक वि. ना. पुरव...

चेंबूरमधील स्वातंत्र्यसैनिक, गांधीविचारांचे निष्ठावंत अनुयायी आणि...

महापौर रितू तावडे, उपमहापौर...

मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी विविध प्रदूषणकारी स्रोतांवर प्रभावी...