हैडलाइन

कोकणवासीयांची प्रतीक्षा संपली, CSMT ते सावंतवाडी रोड नियमित एक्सप्रेसला अखेर मंजुरी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस ट्रेन सुरु करण्यास भारतीय रेल्वेने मंजुरी दिल्याबद्दल आज नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा शिवसेना पक्षाच्या वतीने तसेच कोकण वासियांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी संसदीय गटनेते श्रीकांत एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के, महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, खासदार संजय दिना पाटील, खासदार श्रीरंग बारणे, खासदार ओम राजे निंबाळकर यावेळी उपस्थित होते. खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी ही ट्रेन सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला होता. कोकण रेल्वे मार्गावर ही ट्रेन नियमित धावणार असून 22 स्थानकांवर ट्रेनला थांबा मिळाला आहे. या नवीन ट्रेन मुळे गणपतीमध्ये गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी सोय होणार असून नियमित प्रवास करणाऱ्या कोकणवासीयांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.


Most Popular News of this Week

स्वतंत्रता दिवस पर सायन...

देश अपना 80वां स्वतंत्रता दिवस मना रहा है। इसी अवसर पर सायन कोलीवाड़ा...

गोवंडी के VK English High School में...

गोवंडी स्थित VK English High School में 80वें स्वतंत्रता दिवस के अवसर पर ध्वजारोहण एवं...

मुंबई पुलिस, CWC अधिकारियों और...

मुंबई में बाल श्रम से संबंधित मामले के चलते CWC की संरक्षण व्यवस्था में रह रहे...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या...

बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत ‘मुंबई पब्लिक स्कूल, शिवाजी...

‘मेरी धारावी, मेरे...

स्वतंत्रता दिवस के मौके पर धारावी के 40 से ज्यादा स्कूलों के 1,000 से अधिक...

“तिरंगा यात्रा ५२ वर्षे ध्वज...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे प्रवक्ते महेश तपासे यांनी आज...