हैडलाइन

“तिरंगा यात्रा ५२ वर्षे ध्वज न फडकवण्याचा इतिहास पुसू शकत नाही”: महेश तापसे यांचा RSS-BJPच्या कृत्रिम राष्ट्रवादावर घणाघात

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे प्रवक्ते महेश तपासे यांनी आज RSS-BJPच्या तिरंगा रॅलीच्या दिखाव्यांवर तीव्र टीका केली. इतिहासातील नोंदी वेगळीच वस्तुस्थिती सांगत असताना हे लोक नियोजित पद्धतीने “राष्ट्रवादाचे” खोटे प्रदर्शन करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

तपासे म्हणाले, “भाजप आणि त्यांची मातृसंस्था RSS तिरंगा यात्रेच्या नावाखाली फक्त फोटोसेशन करतात आणि उर्वरित देशाला देशभक्तीचे धडे देतात. पण देशभक्ती हा कॅमेऱ्यांसाठी वर्षातून एकदा घालायचा पोशाख नाही. तिला एक इतिहास आहे आणि इतिहास खोटे बोलत नाही.”

महेश तपासे दस्तऐवजांतील तथ्यांकडे लक्ष वेधत  म्हणाले, “RSS ने नागपूर येथील मुख्यालयावर सुरुवातीच्या काळात राष्ट्रीय ध्वज दोनदा फडकवला—१५ ऑगस्ट १९४७ आणि २६ जानेवारी १९५० रोजी. त्यानंतर तब्बल ५२ वर्षे RSS च्या मुख्यालयावर तिरंगा फडकला नाही. २००१ मध्ये राष्ट्रप्रेमी युवा दलाच्या तीन तरुण कार्यकर्त्यांनी तो जबरदस्तीने फडकवला; त्यांच्याविरुद्ध RSS ने पोलिसांत तक्रारही दाखल केली. न्यायालयीन प्रकरण आणि जनतेसमोरील नामुष्कीनंतरच RSS ने स्वतःहून ध्वज फडकवण्यास सुरुवात केली.”

महेश तपासे यांनी RSS चे द्वितीय सरसंघचालक म. स. गोलवलकर यांच्या लिखाणाचाही संदर्भ दिला. “गोलवलकर यांनी स्वतः स्वातंत्र्यलढ्याला केवळ ‘भौगोलिक राष्ट्रवाद’ म्हणून नाकारले होते आणि त्यातून देशाच्या, त्यांच्या मते, ‘खऱ्या हिंदू राष्ट्रत्वाला’ बाधा पोहोचते असे म्हटले होते. त्यांच्या संघटनेचे मुखपत्र ऑर्गनायझरनेही १५ ऑगस्ट १९४७ च्या सुमारास आमच्या स्वातंत्र्यसैनिकांनी रक्त सांडून मिळवलेल्या तिरंग्याची निंदानालस्ती करणारा लेख प्रसिद्ध केला होता.”

भारताच्या संविधान सभेने तिरंग्याचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकार केल्याच्या स्वातंत्र्यपूर्व संध्येला, RSS चे इंग्रजी मुखपत्र ऑर्गनायझरने १४ ऑगस्ट १९४७ च्या अंकात या निवडीची खालील शब्दांत निंदा केली होती:

“नशिबाच्या लाथेने सत्तेवर आलेले लोक आपल्या हातात तिरंगा देऊ शकतात; पण हिंदू त्याचा कधीही आदर करणार नाहीत वा तो आपलासा मानणार नाहीत. तीन हा अंकच अशुभ आहे आणि तीन रंगांचा ध्वज निश्चितच अतिशय वाईट मानसिक परिणाम निर्माण करेल व देशासाठी हानिकारक ठरेल.”

“आता मोहन भागवतजी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या Gen-Z सोबतच्या संवादात याबाबतही बोलतील का?” असा प्रश्न महेश तपासे यांनी उपस्थित केला.

तपासे म्हणाले, “१९२५ मध्ये RSS ची स्थापना झाल्यापासून ते १९४७ पर्यंत संघटना म्हणून RSS ने एकाही स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला नाही—ना सविनय कायदेभंग चळवळीत, ना १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, मौलाना अबुल कलाम आझाद आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारखे नेते ब्रिटिशांच्या तुरुंगात असताना RSS काय करीत होती?” असा सवाल त्यांनी केला.

भाजप-RSS ची तिरंगा मोहिमांबाबतची सध्याची उत्सुकता हा इतिहास पुनर्लिखित करण्याचा प्रयत्न असल्याचे तपासे म्हणाले. “स्वातंत्र्यलढ्यापासून दूर राहून शंभर वर्षांनंतर त्या चळवळीवर प्रेम असल्याचा दावा करता येत नाही. तिरंगा हा त्यासाठी लढलेल्या, त्याग केलेल्या आणि प्राण अर्पण केलेल्या प्रत्येक भारतीयाचा आहे—काँग्रेसजनांचा, समाजवाद्यांचा, क्रांतिकारकांचा आणि कम्युनिस्टांचा. ज्यांनी कधीकाळी त्याला अशुभ म्हटले, त्यांचा तो नाही.”

तपासे पुढे म्हणाले, “खरा राष्ट्रवाद हा ब्रिटिशांविरुद्ध लढलेल्या, तुरुंगवास भोगलेल्या आणि केवळ देशाच्या स्वातंत्र्यासाठी फाशीच्या दोरी स्वतःहून गळ्यात घेतलेल्या वीरांच्या बलिदानातून लिहिला गेला आहे.”


Most Popular News of this Week

ठाकरेंचा मोर्चा, देशभर...

 वाशी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

मोदी सरकार विरोधात शिवाजी...

केंद्र व राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार, निवडणूक आयोगाच्या पक्षपाती...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

स्वातंत्र्यसैनिक वि. ना. पुरव...

चेंबूरमधील स्वातंत्र्यसैनिक, गांधीविचारांचे निष्ठावंत अनुयायी आणि...

महापौर रितू तावडे, उपमहापौर...

मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी विविध प्रदूषणकारी स्रोतांवर प्रभावी...