हैडलाइन

वैद्यकीय सेवा प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या नवीन १०८ रुग्णवाहिकेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी

महाराष्ट्र शासनाच्या  आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या नवीन १०८ रुग्णवाहिका लवकरच शासकीय सेवेत दाखल होणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या रुग्णवाहिकांची पाहणी केली. तसेच त्या लवकरात लवकर शासनाच्या सेवेत दाखल करण्याची प्रक्रिया निश्चित करण्यास सांगितले.

महाराष्ट्र शासनाच्या सेवेत १०८ रुग्णवाहिका सेवेअंतर्गत एकूण १७५६ रुग्णवाहिका दाखल होणार असून त्यातील २५६ रुग्णवाहिका या अँडव्हान्स लाइफ सपोर्ट उपलब्ध करणार आहेत. तर उर्वरित १२०० रुग्णवाहिका या सर्वसाधारण रुग्णवाहिका असतील. 


संपूर्ण भारतीय बनावटीच्या असलेल्या या रुग्णवाहिकांमध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात ईसीजी, ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर, पल्स ऑक्सिमीटर, सक्षन पंप, ऑक्सिजन वितरण प्रणाली तसेच हॉस्पिटल मधील डॉक्टरांशी थेट संवाद साधण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

या योजनेअंतर्गत २५५ जीवनरक्षक म्हणजे ALS आणि १२०४ मूलभूत जीवनरक्षक रुग्णवाहिकांचा समावेश असून त्यात ३६ नवजात बालकांसाठीच्या रुग्णवाहिका,१६६ दुचाकी रुग्णवाहिका, १५ नदी बोट रुग्णवाहिका, १० समुद्री बोट रुग्णवाहिका अशा एकूण १७५६ रुग्णवाहिकांचा समावेश आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस देशभरात सेवा संकल्प अभियान सुरू करण्यात आले असून या अंतर्गत यातील १५० रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत दाखल करण्याचा शासनाचा प्रयत्न असून त्यासाठी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या रुग्णवाहिकांची पाहणी करून त्यात उपलब्ध असलेल्या सेवांची माहिती जाणून घेतली. तसेच त्यात काही बदलही सुचवले. 

यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, कुटंब कल्याण आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे  प्रधान सचिव नवीन सोना, सुमित फेसिलिटीजचे संचालक सुमित साळुंखे आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे अनेक अधिकारी उपस्थित होते.



Most Popular News of this Week

ठाकरेंचा मोर्चा, देशभर...

 वाशी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

मोदी सरकार विरोधात शिवाजी...

केंद्र व राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार, निवडणूक आयोगाच्या पक्षपाती...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

स्वातंत्र्यसैनिक वि. ना. पुरव...

चेंबूरमधील स्वातंत्र्यसैनिक, गांधीविचारांचे निष्ठावंत अनुयायी आणि...

महापौर रितू तावडे, उपमहापौर...

मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी विविध प्रदूषणकारी स्रोतांवर प्रभावी...