हैडलाइन

लातूर जिल्हा बँकेत सहकार पॅनलला घवघवीत यश

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सोमवारी झालेल्या मतमोजणीत माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आमदार अमितजी देशमुख जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनल चे 19 पैकी 15उमेदवार विजयी झाले असून पुन्हा एकदा जिल्ह्यातील शेतकरी सभासदानी केलेल्या कामाच्या जोरावर सत्ताधारी पॅनल ला पूर्ण बहुमत दिलेले आहे त्यामुळे दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलचे बँकेवर वर्चस्व कायम राहिले आहे


सहकार पॅनल चे प्रमुख बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख यांच्या सह सर्व नूतन संचालक मंडळ यांनी सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांची आशियाना निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले त्यानंतर दिलीपराव देशमुख यांनी धीरज देशमुख यांना निवडून आल्याबद्दल पेढा भरवून त्यांचे स्वागत केले व सर्व संचालक मंडळांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या दरम्यान सहकार पॅनल चे विजयी उमेदवार येताच आशियाना निवासस्थानी कार्यकर्ते पदाधिकारी यांनी फटाक्याची आतषबाजी करून मोठ्या प्रमाणात स्वागत केले 


यावेळी जिल्हा बँकेचे नूतन संचालक तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख (प्रक्रिया संघ) नूतन संचालक अविनाश जाधव (अहमदपूर) सर्जेराव मोरे (रेनापुर) हेमंत जाधव (लातूर) जयेश माने (हौसिंग) जगन्नाथ पाटील ( मजूर) संतोष पाटील ( चाकुर) प्रीती भोसले (उदगीर) आशिष पाटील ( जळकोट)विवेक शिरसाठ ( अनुसूचित जाती जमाती) चंद्रशेखर दंडीमे (ओबीसी मतदार संघ) अँड शेषराव हाके ( इतर मागास)पाटील शीतल कल्याण, गीतांजली लांडगे (महिला मतदार संघ) यांच्या सह जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संतोष देशमुख यांच्या सह सन्माननीय काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गेल्या अनेक वर्षांपासून केलेले कार्य व मागच्या पाच वर्षात अतिशय पारदर्शक कारभार करत शेतकऱ्यांना विविध योजना राबवून जास्तीत जास्त मदत करण्यासाठी पुढाकार घेतला होता त्या कामाची पावती आज मतदारांनी निकालातून दिली असून मतदारांचे आशीर्वाद व दिलेल्या आश्वासनाची पूर्तता आगामी काळात शेतकऱ्यांच्यासाठी चांगल काम करणार असून सर्वांना सोबत घेऊन आम्ही ते पूर्ण करणार असून सहकार पॅनल चे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनल सर्व उमेदवारांना विजयी केल्याबद्दल मतदारांचे आभार व्यक्त करून सर्वांना सोबत घेऊन जे जे चांगल काम करता येईल तो पारदर्शकता ठेवून काम करण्यासाठी माझा प्रयत्न राहणार असल्याचे धीरज विलासराव देशमुख यांनी यावेकी बोलताना स्पष्ट केले


Most Popular News of this Week

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड....

 सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक...

आमदार दिलीप लांडे...

 शिवसेना आमदार दिलीप (मामा) लांडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या...

गुर्जरगौड़ ब्राह्मण समाज का...

मुंबई। गुर्जरगौड़ ब्राह्मण हितैषिणी सभा (रजि.), मुंबई द्वारा आयोजित दिवाली...

भगवान बिरसा मुंडा यांचा...

पुणे दि. १५ नोव्हेंबर -जल... जमीन आणि जंगलाशी नातं जोडून जगणाऱ्या आदिवासी...

क्रांतिकारक बिरसा मुंडा...

क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त, बृहन्मुंबई महानगरपालिका...

पंडित जवाहरलाल नेहरुंचे...

स्पर्धा आणि भांडवलशाहीच्या युगात केंद्रातील मोदी सरकार रोजगार...