हैडलाइन

महानगरपालिका शाळांतील पाच विद्यार्थ्यांचे पोस्टर श्रेणीत, तर एका विद्यार्थ्याचे रॅप साँग श्रेणीत यश

पर्यावरण संवर्धन, स्वच्छ हवा आणि वातावरणीय बदल यांसारख्या महत्त्वाच्या विषयांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याबरोबरच त्यांच्या सर्जनशील अभिव्यक्तीला प्रोत्साहन देण्याच्या उद्धेशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘ब्लू स्काइज २०२६’ (Blue Skies 2026) या स्पर्धेत महानगरपालिका शाळांमधील सहा विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.  यशस्वी विद्यार्थ्यांचा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अविनाश ढाकणे यांच्या हस्ते महानगरपालिका मुख्यालयात सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन नुकताच गौरव करण्यात आला. पाच विद्यार्थ्यांनी पोस्टर श्रेणीत, तर एका विद्यार्थ्याने रॅप साँग श्रेणीत यश संपादन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा, कलात्मकतेचा आणि सर्जनशीलतेचा अप्रतिम आविष्कार घडवत अतिशय सुबक, देखणी, मनमोहक, आशयपूर्ण आणि विलक्षण प्रभावी चित्रे साकारल्याबद्दल अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अविनाश ढाकणे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. 


उप आयुक्त (पर्यावरण व वातावरणीय बदल) अविनाश काटे, शिक्षण अधिकारी (माध्यमिक) सुजाता खरे, उपशिक्षण अधिकारी श्रीमती ममता राव, अधीक्षक (शाळा) माधुरी महाजन, कला प्राचार्य  दिनकर पवार तसेच मार्गदर्शक शिक्षक याप्रसंगी उपस्थित होते.


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील इयत्ता सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ब्लू स्काइज २०२६’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. निबंध, पोस्टर, चित्रकला, गाणे, रॅप साँग आणि व्हिडिओ अशा विविध श्रेणींमध्ये विद्यार्थ्यांना आपली सर्जनशीलता आणि पर्यावरणविषयक जाणीवा व्यक्त केल्या. 


विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून आणि कल्पनाशक्तीतून उतरलेल्या प्रत्येक कलाकृतीत रंगसंगतीचे अनोखे भान, बारकाव्यांची अचूक मांडणी, विषयाची सखोल समज आणि भावभावनांचे सुंदर प्रतिबिंब पाहायला मिळाले. काही छायाचित्रे आपल्या नजरेला खिळवून ठेवणारी, काही मनाला स्पर्श करणारी, तर काही विचारांना नवी दिशा देणारी ठरली. त्यांच्या या प्रतिभासंपन्न सादरीकरणातून केवळ कलागुणांचे दर्शन घडले नाही, तर त्यांच्या संवेदनशीलतेची, निरीक्षणक्षमतेची आणि सर्जनशील विचारशक्तीचीही प्रभावी प्रचिती आली. 


पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, शिक्षण विभाग, WRI इंडिया आणि C40 सिटीज (C40 Cities) यांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या समितीने सहभागी सर्व विद्यार्थ्यांच्या कलाकृतींची छाननी करून सहा विद्यार्थ्यांच्या चित्रांची आणि रॅप साँगची निवड केली. महाराष्ट्र नगर इंग्रजी शाळेतील इयत्ता आठवी विद्यार्थीनी प्राची राजेश पटेल, अंधेरी पश्चिम इंग्रजी शाळेतील इयत्ता आठवीची विद्यार्थीनी सादिका रिजवान अन्सारी, शिवाजीनगर महानगरपालिका हिंदी शाळा क्र. १, गोवंडी शाळेतील इयत्ता सातवीचा विद्यार्थी अनुराग उमेश साहनी, मानखुर्द महानगरपालिका मराठी शाळा क्र. २ मधील इयत्ता आठवीतील सुमित रामगोपाल शर्मा आणि आगारवाडी हिंदी शाळा क्र. १ शाळेतील इयत्ता आठवीचा अचल विनयकुमार जैस्वार यांची पोस्टर श्रेणीत, तर  महानगरपालिका सीबीएसई शाळा, चिकूवाडी शाळीतल इयत्ता आठवीतील अंश प्रजेश कल्लुपालम या विद्यार्थ्याची रॅप साँग श्रेणीत  निवड झाली. या सर्व विद्यार्थ्यांना महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे)


Most Popular News of this Week

मुंबईच्या महापौर रितू तावडे...

महात्मा जोतिबा फुले मंडई (पूर्वीचे क्रॉफर्ड मार्केट) हे मुंबईतील ऐतिहासिक...

KNOW YOUR ARMY EVENT INAUGURATED IN MUMBAI

The Indian Army inaugurated a three-day "Know Your Army" - Mega Equipment & Motivational Exhibition at the Colaba Military Station, Mumbai, on 29 October 2026. The event was inaugurated by Lt Gen...

एमआयडीसीतील कंपन्यांची...

 जिल्ह्याला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी रत्नागिरी...

बाह्यस्रोत आरोग्य...

 नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत मे. डी. एस. एंटरप्रायझेस यांच्या...

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा...

 प्रमाणात कचरा साचण्याच्या संभाव्य ठिकाणांचे (Garbage Vulnerable Points – GVPs) निर्मूलन...

मुंबईतील वायू गुणवत्ता...

मुंबईतील वायू गुणवत्ता राखण्यासाठी तसेच रस्त्यांवरील धूळ आणि बांधकाम व...