हैडलाइन

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचे प्रत्यक्ष पाहणीदरम्यान संबंधितांना निर्देश

महात्मा जोतिबा फुले मंडई (पूर्वीचे क्रॉफर्ड मार्केट) हे मुंबईतील ऐतिहासिक व जागतिक कीर्तीचे वारसास्थळ आहे. येथे दररोज मोठ्या संख्येने व्यापारी, ग्राहक आणि देश-विदेशातील पर्यटक देखील भेट देतात. या पार्श्वभूमीवर मंडईतील स्वच्छता अधिक प्रभावीपणे करावी, सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करावी, स्थानिक व्यापारी व ग्राहकांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करावे, असे निर्देश मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिले आहेत.


बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाजवळ स्थित महात्मा जोतिबा फुले मंडई व परिसराची मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आज (दिनांक २८ ऑक्‍टोबर २०२६) सकाळी प्रत्यक्ष पाहणी केली. सी आणि डी प्रभाग अध्‍यक्ष . आकाश राज पुरोहित, नगरसेविका हर्षिता नार्वेकर, नामनिर्देशित नगरसेवक अॅड. कमलाकर दळवी, ए विभागाचे सहायक आयुक्‍त . उज्‍वल इंगोले, सहायक आयुक्‍त (बाजार) . नितीन शुक्ला यांच्‍यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.या पाहणीदरम्‍यान महापौर रितू तावडे यांनी मंडईचा पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा, सार्वजनिक स्‍वच्‍छता, अतिक्रमण, सुरक्षा व्‍यवस्‍था आणि मंडईच्या ऐतिहासिक वारशाचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या प्याऊ तसेच कारंज्याची पाहणी करून सविस्तर आढावा घेतला. महात्मा फुले मंडई दुकानदार सेवा संस्था यांनी दिलेले निवेदन स्वीकारुन त्यांच्या समस्या व मागण्याही महापौर तावडे यांनी जाणून घेतल्या.


महापौर रितू तावडे म्‍हणाल्‍या की, महात्मा जोतिबा फुले मंडई हे मुंबईच्या ऐतिहासिक वारशाचे प्रतीक आहे. जागतिक कीर्तीचे वारसास्थळ म्हणून या मंडईला विशेष महत्त्व आहे. मंडईचा परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि सुव्यवस्थित ठेवण्यास प्राधान्य द्यावे. मंडईत येणाऱ्या व्यापारी व ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्यांची गांभीर्याने दखल घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करावे. यासोबतच मंडईतील पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था आणि अन्य मूलभूत सुविधांची नियमित तपासणी करून त्या सुरळीत कार्यरत राहतील, याची दक्षता घ्यावी. मंडईच्या ऐतिहासिक वास्तूचे आणि वारसा स्थळाचे महत्त्व जपत परिसरातील अतिक्रमणांवर नियमानुसार कार्यवाही करावी. नवीन विकसित होत असलेल्या इमारत व परिसरात बायो - टॉयलेटची सुविधा उपलब्‍ध करता येईल का, याची चाचपणी करावी. सांडपाणी वाहिन्‍यांची नियमितपणे स्‍वच्‍छता करावी तसेच मंडई परिसराचा विकास होताना सांडपाण्याची समस्या निकाली निघेल, याची तजवीज करावी. पुरातन पाणपोईचे जतन व संवर्धन करून तिचे पुनरुज्जीवन करावे. मंडई परिसराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्‍ही यंत्रणा लावावी, असे विविध निर्देश महापौर श्रीमती तावडे यांनी दिले. 


Most Popular News of this Week

मुंबईच्या महापौर रितू तावडे...

महात्मा जोतिबा फुले मंडई (पूर्वीचे क्रॉफर्ड मार्केट) हे मुंबईतील ऐतिहासिक...

KNOW YOUR ARMY EVENT INAUGURATED IN MUMBAI

The Indian Army inaugurated a three-day "Know Your Army" - Mega Equipment & Motivational Exhibition at the Colaba Military Station, Mumbai, on 29 October 2026. The event was inaugurated by Lt Gen...

एमआयडीसीतील कंपन्यांची...

 जिल्ह्याला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी रत्नागिरी...

बाह्यस्रोत आरोग्य...

 नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत मे. डी. एस. एंटरप्रायझेस यांच्या...

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा...

 प्रमाणात कचरा साचण्याच्या संभाव्य ठिकाणांचे (Garbage Vulnerable Points – GVPs) निर्मूलन...

मुंबईतील वायू गुणवत्ता...

मुंबईतील वायू गुणवत्ता राखण्यासाठी तसेच रस्त्यांवरील धूळ आणि बांधकाम व...