हैडलाइन

बाह्यस्रोत आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे; महापौर रितू तावडे यांच्या मध्यस्थीला यश

 नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत मे. डी. एस. एंटरप्रायझेस यांच्या कंत्राटाखाली कार्यरत बाह्यस्रोत आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुकारलेले आंदोलन आज (दिनांक २९ ऑक्टोबर २०२६) सायंकाळपासून मागे घेण्यात आले आहे. आंदोलक कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनात आज सायंकाळी सदिच्छा भेट घेतली आणि आंदोलन मागे घेत असल्याचे लेखी पत्र महापौरांना सुपूर्द केले.


या शिष्टमंडळात स्वराज्य संघटनेचे युवक अध्यक्ष . संतोष कदम, सचिव राहुल पाटील यांच्यासह . गिरीश सुर्वे, . परेश मेटकर, . दीपक चव्हाण, . प्रवीण चव्हाण, . पंकज धाडवे, हर्षदा डुंबरे, प्रतीक्षा भागवत, रेश्मा कोचले आणि सुमन शिगवण आदी प्रतिनिधी उपस्थित होते.


विविध प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदान येथे दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ पासून हे आंदोलन सुरू होते. कर्मचाऱ्यांच्या मागण्या जाणून घेत महापौर रितू तावडे यांनी आंदोलनस्थळी थेट भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर महापौरांनी महानगरपालिका प्रशासनाला निर्देश देऊन मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या.


प्रशासनाने या मागण्यांवर सकारात्मक पावले उचलत बाह्यस्रोत महिला कर्मचाऱ्यांच्या मातृत्वाच्या जबाबदाऱ्या आणि आर्थिक सुरक्षिततेचा विचार करून त्यांना १८० दिवसांची सवेतन प्रसूती रजा मंजूर केली आहे.


तसेच, या बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांच्या सुधारित किमान वेतनाबाबतचा प्रस्ताव प्रमुख कामगार अधिकारी आणि वित्त विभागाकडे सादर करण्यात आला आहे. वेतन विलंबाच्या तक्रारींवर संबंधित कंत्राटदार संस्थेवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अशा समस्यांच्या कायमस्वरूपी निराकरणासाठी विशेष तक्रार निवारण समिती स्थापन करून कार्यवाही केली जाणार आहे. सद्यस्थितीत सप्टेंबर २०२६ पर्यंत या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात आले आहे.


त्याचप्रमाणे, कोविड काळात मुंबईकरांसाठी आरोग्य सेवा देणाऱ्या अनुभवी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याकरिता 'एकवेळचे धोरण' आणि दिवाळी सानुग्रह अनुदान (बोनस) या शासनस्तरावरील धोरणात्मक बाबी असल्याने, त्यासंदर्भात महानगरपालिकेकडून राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे, असे या कर्मचाऱ्यांसमोर स्पष्ट करण्यात आले आहे.


महापौरांची संवेदनशील मध्यस्थी आणि महानगरपालिका प्रशासनाने घेतलेले सकारात्मक निर्णय याबद्दल शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले. कर्मचारी प्रतिनिधींनी महापौर दालनात प्रत्यक्ष उपस्थित राहून महापौर रितू तावडे आणि महानगरपालिका प्रशासनाचे आभार मानत आंदोलन मागे घेतल्याचे लेखी जाहीर केले.


Most Popular News of this Week

मुंबईच्या महापौर रितू तावडे...

महात्मा जोतिबा फुले मंडई (पूर्वीचे क्रॉफर्ड मार्केट) हे मुंबईतील ऐतिहासिक...

KNOW YOUR ARMY EVENT INAUGURATED IN MUMBAI

The Indian Army inaugurated a three-day "Know Your Army" - Mega Equipment & Motivational Exhibition at the Colaba Military Station, Mumbai, on 29 October 2026. The event was inaugurated by Lt Gen...

एमआयडीसीतील कंपन्यांची...

 जिल्ह्याला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी रत्नागिरी...

बाह्यस्रोत आरोग्य...

 नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत मे. डी. एस. एंटरप्रायझेस यांच्या...

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा...

 प्रमाणात कचरा साचण्याच्या संभाव्य ठिकाणांचे (Garbage Vulnerable Points – GVPs) निर्मूलन...

मुंबईतील वायू गुणवत्ता...

मुंबईतील वायू गुणवत्ता राखण्यासाठी तसेच रस्त्यांवरील धूळ आणि बांधकाम व...