वर्षा गायकवाड लढवय्या नेत्या, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कट्टीबद्ध - रमेश चेन्नीथला

वर्षा गायकवाड लढवय्या नेत्या, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कट्टीबद्ध - रमेश चेन्नीथला


उत्तर मध्य मुंबईसह मुंबईचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार -वर्षा गायकवाड


उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या न्यायपत्राचे प्रकाशन


मुंबई: निवडून आल्यानंतर जनतेसाठी काय करणार यासाठीचे न्याय पत्र वर्षा गायकवाड यांनी सादर केले आहे. वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यांनीही आयुष्यभर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनतेसाठी काम केले आहे. वर्षा गायकवाड वडिलांचा वारसा पुढे नेत असून त्या लढवय्या नेत्या आहेत. आमदार व मंत्री म्हणून काम करत असताना मुंबईकरांच्या प्रश्नासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांना विजयी करुन संसदेत पाठवा, मुंबईकरांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासठी त्या कट्टीबद्ध आहेत, असे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे.

उत्तर मध्य मुंबईच्या इंडिया आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या न्यायपत्राचे प्रकाशन प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षात काय केले व पुढे काय करणार यावर ते बोलत नाहीत. प्रत्येक भाषणात मोदी हिंदू, मुस्लीम, पाकिस्तान यावरच बोलत असून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु जनता त्यांच्या भुलथापांना बळी पडणार नाही. ४ जूनला देशातील भाजपाचे सरकार जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबईकरांना भेडसावत असलेल्या समस्यांवर जनतेशी चर्चा करून एक त्रिसुत्री बनवण्यात आली असून या न्यायपत्राच्या माध्यमातून मुंबईकरांचे प्रश्न मांडलेले आहेत. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर ह्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. मुंबईतील मोकळ्या जागांचे संवर्धन करणे, झाडांची कत्तल होऊ नये, विमानतळ फनेल झोन मधील पुनर्वसनासाठी विशेष धोरण आखले जावे यासाठी प्रयत्न केला जाईल. मुंबईची जीवनवाहिनी लोकलमधील गर्दी कमी व्हावी यासाठी लोकलची संख्या वाढवणे, लांब पल्ल्याच्या रेल्वेचा दर्जा उंचावण्याची गरज आहे. हाऊसिंग सोसायट्यांवर लावलेला अन्यायकारक जीएसटी कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. मुंबई शहरात प्रदुषण ही सुद्धा एक महत्वाची समस्या असून त्यावर उपाय योजना करण्यावरही भर दिला जाईल, असे आश्वासन वर्षा गायकवाड यांनी दिले आहे.

यावेळी  प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान म्हणाले की, काँग्रेस पक्षाने न्यायपत्र जाहीर केलेले आहे, ५ न्याय आणि २५ गॅरंटी दिलेल्या आहेत. इंडिया आघाडीला जनतेचे १०० टक्के समर्थन मिळत असून पाचव्या टप्यातही जनतेचे समर्थन कायम राहिल. मुंबईतील महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास नसीम खान यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, आमदार अमिन पटेल, प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत, संगठन प्रभारी प्रनिल नायर, खजिनदार संदीप शुक्ला, प्रवक्ते युवराज मोहिते, सुरेशचंद्र राजहंस, आनंद शुक्ला, महेंद्र मुणगेकर आदी उपस्थित होते.




Most Popular News of this Week

शनिवार को सजेगी हार्मनी...

शनिवार को सजेगी हार्मनी म्यूजिकल की मैफिलग्लोबलचक्र- संध्या...

सनातन संस्था द्वारा देशभर में...

सनातन संस्था द्वारा देशभर में 75 स्थानों पर ‘गुरुपूर्णिमा महोत्सव’...

आधुनिकतावादी एवं और...

हिंदू जनजागृति समिति और राष्ट्रीय वारकरी परिषद की पंढरपुर में...

कर्मचारियों के नाम पर गोल्ड...

कर्मचारियों के नाम पर गोल्ड लोन लेकर अनेको बैंकों के साथ लाखो की ठगी,नकली...

आवश्यक निर्माणों को मालिकाना...

आवश्यक निर्माणों को मालिकाना हक देकर नियमित किया जाए- विधायक गणेश नाईक की...

नवी मुंबई के अवैध स्कूलों पर 15...

नवी मुंबई के अवैध स्कूलों पर 15 करोड़ 54 लाख रुपये का जुर्माना नवी मुंबई। नवी...