हैडलाइन

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी लावणी कलाकारांकडून एक लाख रुपयांचा निधी सुपूर्द

 राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये योगदान देण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सुरू केलेल्या उपक्रमाला कलाकार आणि सांस्कृतिक संस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत लावणी कलाकारांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपयांचा निधी दिला असून, या रकमेचा धनादेश आज सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर यांनी हा धनादेश मंत्री शेलार यांच्याकडे सुपूर्द केला.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या आवाहनानुसार, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीची नाट्यगृहे सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या माध्यमातून विविध कलाकार आणि सांस्कृतिक संस्था कार्यक्रमांचे आयोजन करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी योगदान देत आहेत. कलाकारांच्या कलागुणांना सामाजिक कार्याची जोड देत दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी योगदान देण्याची संधी या उपक्रमातून उपलब्ध झाली आहे. लावणी, संगीत, नृत्य, नाटक आणि हिंदी चित्रपटगीतांवर आधारित कार्यक्रमांच्या माध्यमातून निधी संकलन करण्यात येत आहे. विविध क्षेत्रांतील नामवंत कलाकारांनी या उपक्रमात सहभाग नोंदविण्याची तयारी दर्शविल्याने सांस्कृतिक क्षेत्रातून या सामाजिक कार्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी ५ ऑक्टोबर रोजी आयोजित बैठकीत कलाकार आणि सांस्कृतिक संस्थांना कार्यक्रमांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीने उपलब्ध तारखांनुसार नाट्यगृहे विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम तूर्तास ३१ मार्च २०२७ पर्यंत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत २६ ऑक्टोबर रोजी लावणी कलावंत महासंघाच्या वतीने लावण्यसोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात कविता घडशी, आकांक्षा कदम, विद्या सदाफुले, गौरी जाधव, मोना गावडे, वर्षा दर्पे आणि हर्षला राऊत यांच्यासह विविध कलाकार सहभागी झाले.

१२ नोव्हेंबर रोजी संस्कृती फाउंडेशनच्या वतीने भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायलेल्या गीतांवर आधारित नृत्यसादरीकरण होणार असून, गुरु शुभदा वराडकर यांचे सादरीकरण हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असेल. १४ नोव्हेंबर रोजी ‘अमरदीप, कल्पकला आणि सृजन’ निर्मित ‘आता थांबवायचं कसं’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. यामध्ये सुकन्या कुलकर्णी मोने, जान्हवी पणशीकर, आकाश पाटील, ऐश्वर्या शेटे आणि डॉ. गिरीश ओक सहभागी होणार आहेत. याशिवाय ६ डिसेंबर रोजी राहुल देशपांडे यांचा कार्यक्रम, ९ जानेवारी २०२७ रोजी अर्चना अनिरुद्ध यांचा ‘शाम-ए-अदा’ हा बॉलिवूड गीतांवर आधारित कार्यक्रम आणि १२ जानेवारी रोजी संजीवनी भेलांडे यांचा हिंदी गीतांचा कार्यक्रम प्रस्तावित आहे. पुण्यातील भरत नाट्यसंशोधन मंदिराच्या वतीने फेब्रुवारीमध्ये सलग तीन दिवस संगीत नाटक महोत्सव आयोजित करण्याचे नियोजन आहे.

या उपक्रमात सहभागी होणाऱ्या संस्थांना अकादमीच्या उपलब्धतेनुसार नाट्यगृह, तालीम दालन तसेच उपलब्ध प्रकाश व ध्वनिव्यवस्थेच्या सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कार्यक्रमांतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जमा करावयाची रक्कम अकादमीच्या नियमावलीनुसार निश्चित करण्यात आली आहे. संबंधित संस्थांना निर्धारित रकमेचा धनादेश कार्यक्रमाच्या दिवशी अकादमी प्रशासनाकडे सुपूर्द करावा लागणार आहे. कार्यक्रमांच्या जाहिराती, निमंत्रणपत्रिका आणि प्रसिद्धी साहित्यामध्ये पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांचा उल्लेख तसेच अकादमीचा लोगो ठळकपणे प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. कलाकार आणि सांस्कृतिक संस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमात सहभागी व्हावे आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.


Most Popular News of this Week

खाकी वर्दीचा माज की कायद्याचा...

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर दिवसेंदिवस...

INDIAN NAVY SUCCESSFULLY RESCUES HIJACKED FISHING VESSEL ‘AZINI’ OFF THE...

In a swift and well-coordinated operation spanning over 48 hours, the Indian Navy successfully liberated the fishing vessel, Azini, from armed pirates. The operation culminated in the safe rescue of...

2 MAHARASHTRA NAVAL UNIT NCC SUCCESSFULLY CONCLUDES MENU 27 OPEN SEA SAILING...

The 2 Maharashtra Naval Unit National Cadet Corps, based at Ratnagiri, successfully conducted the Flag-In ceremony of the Most Enterprising Naval Unit (MENU 27) Open Sea Sailing Expedition. After...

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या...

स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान, भारत रत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या...

मुंबईच्या महापौर रितू तावडे...

मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व...

महाराष्ट्राच्या सागरी...

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बंदर,...