हैडलाइन

राहुल गांधी, संजय राऊत हेच खरे बहुमत चोरीच्या परंपरेचे जनक

गोकुळ सहकारी संस्थेच्या लहानशा निवडणुकीचा दाखला देण्यापेक्षा राहुल गांधींनी 2019 मध्ये महाराष्ट्रात काय घडले होते, याचा दाखला देशातील जनतेला दिला पाहिजे. त्यावेळी भाजपा - शिवसेनेला महाराष्ट्रातील जनतेने बहुमत दिले होते. त्यामुळे देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होतील, याबद्दल कुणालाही शंका नव्हती. काँग्रेसला महाराष्ट्रात फक्त 40 ते 42 जागा मिळाल्या असतानाही राहुल गांधींचा पक्ष महाराष्ट्रात सत्तेत बसला होता. बहुमत चोरण्याचे काम उद्धव ठाकरे, राहुल गांधी, संजय राऊत यांनी मिळून केले होते. त्यामुळे राहुल गांधी आणि संजय राऊत हेच खरे या परंपरेचे जनक आहेत, असा प्रहार भाजपा प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात ते बोलत होते.  

गोकुळमध्ये दूध उत्पादकांनी भाजपाला हरवले आहे; पण भाजपा इतका हताश झाला आहे की, प्रत्येक ठिकाणी सत्ता वाचवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो, कुठलीही मर्यादा ओलांडू शकतो, असे म्हणणाऱ्या राहुल गांधींना इतकेच सांगायचे आहे की, इंदिरा गांधी यांच्याविरोधात निर्णय देत सर्वोच्च निर्णय न्यायालयाने त्यांची निवडणूक अवैध ठरवली होती, त्यावेळी या देशात आणीबाणी लादण्याचा प्रकार इंदिरा गांधींनी केला होता, हा काँग्रेसचा इतिहास आहे. स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी आणीबाणी लावत विरोधकांना दोन-दोन वर्षे तुरुंगात डांबले. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यासारख्या जनसंघाच्या हजारो नेत्यांना, कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकले होते. हा तुमचा इतिहास आहे, असे  बन यांनी सुनावले. 

 बन पुढे म्हणाले, महाराष्ट्राचे राजकारण करण्यास देवेंद्रजी फडणवीस लायक आहेत म्हणूनच जनतेने त्यांना 2014 मध्ये मुख्यमंत्री केले. 2019 मध्ये बहुमत दिले, 2024 मध्येही बहुमत दिले. देवेंद्रजी फडणवीस लायक आहेत म्हणूनच आज ते महाराष्ट्राचे नायक म्हणून मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. संजय राऊतांचे मालक उद्धव ठाकरे देवाभाऊंना म्हणाले होते, 'एक तर तू राहशील किंवा मी राहीन.' देवाभाऊंना महाराष्ट्रातील जनतेने आशीर्वाद दिले आणि त्यांचे नेतृत्व स्वीकारले. 'तू राहशील की मी राहीन' असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना जनतेने घरी बसवले. हा महाराष्ट्राचा इतिहास संजय राऊतांनी वाचावा आणि मग देवाभाऊंवर टीका.

संजय राऊत, जरा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करा, असे सांगून  बन म्हणाले, ट्रम्प पहिल्यांदा गेले, त्यानंतरही तुम्ही असेच म्हणाला होता की, डोनाल्ड ट्रम्प गेले, आता मोदीही जातील. नरेंद्र मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाले, तेव्हा बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. बराक ओबामांनंतर डोनाल्ड ट्रम्प आले, तरी मोदी पंतप्रधान राहिले. ट्रम्प गेले, जो बायडेन आले, तरी मोदी पंतप्रधान राहिले. जो बायडेन गेले आणि पुन्हा ट्रम्प आले, तरी मोदी पंतप्रधानपदी कायम राहिले. आता ट्रम्प जाऊन आणखी कोणी आले, तरी देशाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदीच करतील. बराक ओबामा, ट्रम्प, जो बायडेन, पुन्हा ट्रम्प आणि आणखी कुठला पाचवा राष्ट्राध्यक्ष येईल, तोपर्यंत देशाच्या राजकारणात मोदीजींचा सूर्य तळपत राहील. 2029 मध्येही जनता मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवेल आणि पुन्हा एकदा चौथ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील.


Most Popular News of this Week

मुंबईच्या महापौर रितू तावडे...

महात्मा जोतिबा फुले मंडई (पूर्वीचे क्रॉफर्ड मार्केट) हे मुंबईतील ऐतिहासिक...

KNOW YOUR ARMY EVENT INAUGURATED IN MUMBAI

The Indian Army inaugurated a three-day "Know Your Army" - Mega Equipment & Motivational Exhibition at the Colaba Military Station, Mumbai, on 29 October 2026. The event was inaugurated by Lt Gen...

एमआयडीसीतील कंपन्यांची...

 जिल्ह्याला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी रत्नागिरी...

बाह्यस्रोत आरोग्य...

 नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत मे. डी. एस. एंटरप्रायझेस यांच्या...

मुंबईतील वायू गुणवत्ता...

मुंबईतील वायू गुणवत्ता राखण्यासाठी तसेच रस्त्यांवरील धूळ आणि बांधकाम व...

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा...

 प्रमाणात कचरा साचण्याच्या संभाव्य ठिकाणांचे (Garbage Vulnerable Points – GVPs) निर्मूलन...