हैडलाइन

महाराष्ट्रात षंढगिरीची सुरुवात करणाऱ्या संजय राऊतांनी गोकुळ प्रकरणावर बोलू नये

 गोकुळमध्ये जे घडतेय त्याकडे बोट दाखवताना त्या परंपरेची सुरुवात आपण केली होती, हे जनाब संजय राऊत यांनी लक्षात ठेवावे. 2019 मध्ये महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी तुम्ही भाजपासोबत युती केली होती. भाजपाच्या नावावर मते मागितली. देवेंद्रजी फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी जनतेने बहुमत दिले असताना फक्त आणि फक्त मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला आणि काँग्रेसच्या दावणीला आपला पक्ष बांधला. याला षंढगिरी म्हणतात आणि या षंढगिरीची महाराष्ट्रात सुरुवात तुम्ही आणि तुमच्या मालकांनी केली, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

मिर्झा, खान, औरंगजेब यांचे समर्थन केल्याशिवाय संजय राऊत यांना पर्याय नसल्याचे सांगून  बन म्हणाले, त्यांना हिरवी मते हवी आहेत. खानाच्या पिल्लावळीचा उदोउदो करण्याचे काम संजय राऊत आणि औरंगजेबाचा उदोउदो करण्याचे काम उद्धवजी ठाकरेंकडून केले जातेय. तुम्हाला फक्त हिंदूंचे सण आल्यानंतरच प्रदूषण आठवते का? होळी आल्यावर इको-फ्रेंडली होळी, दिवाळी आल्यानंतर इको-फ्रेंडली दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करता. बकरी ईदच्यावेळी संजय राऊत यांची दातखिळी बसते का? फक्त हिंदूंकडे बोटे दाखवायची, हिंदूंच्या परंपरांचा, सणांचा अपमान करायचा, एवढाच अजेंडा उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि मिर्झासारख्या लोकांचा असतो. एक लक्षात घ्या, देशातला हिंदू नागरिक जागा झालेला आहे. तो तुमच्यासारख्यांचा नाटकीपणा ओळखतोय. तुम्ही यावेळी बकरी ईदला इको-फ्रेंडली बकरी साजरी करा, पिठाची बकरी कापा, असे आवाहन करणारा व्हिडिओ करा आणि मग हिंदूंच्या सणांना आक्षेप घ्या.

रस्त्यावर तांडव करण्याची वेळ संजय राऊत, तुमच्या पक्षावर आली आहे. महाराष्ट्रातल्या जनतेने तुम्हाला नाकारत रस्त्यावर आणले. तुम्हाला सत्ता चालवता येत नाही, तुम्हाला आम्ही सत्तेवर बसवत नाही, तर तुम्हाला रस्त्यावर आणतोय, सांगितले. आपला अख्खा उबाठा गट रस्त्यावर आलाय. देवाभाऊंनी शेतकऱ्यांना मदत केली. महाराष्ट्राच्या इतिहासात आजवर एकाही सरकारने शेतकऱ्यांना 5 हजार रुपये आगाऊ मदत दिली नव्हती. दोन दिवसांपासून जवळपास दीड कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 5 हजार रुपये भरले जात आहेत. याआधी काँग्रेस, राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंनी एव्हढी मदत केली नव्हती. ही अंतिम मदत नाही. यानंतर पंचनामे झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांना तेवढी मदत केली जाईल. महाविकास आघाडीचे सरकार असताना तुम्ही बांधावर जाऊन 50 हजार रुपये देऊ, 25 हजार रुपये देऊ, अशा थापा मारल्या आणि एक दमडी, फुटकी कवडीही दिली नव्हती, अशी आठवण  बन यांनी केली. 

बन पुढे म्हणाले, या महाराष्ट्रात चार संजय राऊत आहेत. एक संजय राऊत उद्धव ठाकरेंची गुलामी करतात, दुसरे संजय राऊत राहुल गांधींची चाकरी करतात आणि तिसरे संजय राऊत शरद पवारांचे लांगूलचालन करतात. आता त्यात चौथ्या संजय राऊतांची भर पडली. चौथे संजय राऊत म्हणजे चीनचे एजंट आहेत. चीनची एजंटगिरी करणाऱ्या संजय राऊत यांनी इतरांवर टीका करण्याआधी आपले चार वेगवेगळे चेहरे कसे आहेत, हे महाराष्ट्राला सांगावे आणि मगच एकनाथजी शिंदे यांच्यावर टीका करावी.


Most Popular News of this Week

खाकी वर्दीचा माज की कायद्याचा...

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर दिवसेंदिवस...

INDIAN NAVY SUCCESSFULLY RESCUES HIJACKED FISHING VESSEL ‘AZINI’ OFF THE...

In a swift and well-coordinated operation spanning over 48 hours, the Indian Navy successfully liberated the fishing vessel, Azini, from armed pirates. The operation culminated in the safe rescue of...

2 MAHARASHTRA NAVAL UNIT NCC SUCCESSFULLY CONCLUDES MENU 27 OPEN SEA SAILING...

The 2 Maharashtra Naval Unit National Cadet Corps, based at Ratnagiri, successfully conducted the Flag-In ceremony of the Most Enterprising Naval Unit (MENU 27) Open Sea Sailing Expedition. After...

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या...

स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान, भारत रत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या...

मुंबईच्या महापौर रितू तावडे...

मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व...

महाराष्ट्राच्या सागरी...

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बंदर,...