हैडलाइन

भारतीय जनता पक्ष, आम आदमी पार्टी व सामाजिक कार्यकर्त्यांचाही काँग्रेसमध्ये प्रवेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस रणजित श्रीकांत शिरोळे यांनी आज काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे पक्ष प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी मंत्री अनिस अहमद आदी उपस्थित होते.उरण येथील भाजपाचे पदाधिकारी यशवंत म्हात्रे, आम आदमी पक्षाचे थॉमस मॅथ्यू, सामाजिक कार्यकर्ते जयेश ठाकूर, कृष्णा श्रीवास्तव, सेधुरमण अय्यर यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचे काँग्रेसमध्ये स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.


देशातील वातावरण बदलले असून राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर सर्व स्तरातून विश्वास व्यक्त केला जात असून काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा ओघही वाढत आहे. दिवाळीची सुरुवात पक्षप्रवेशाचे फटाके फोडून झालेली आहे. आगामी काळात अनेक तरुण व उमदे नेतृत्व काँग्रेस पक्षात प्रवेश करतील, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..शिरोळे कुटुंबाचा काँग्रेस विचारांशी जुना ऋणानुबंध आहे, तोच वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून राहुल गांधी यांचे हात बळकट करण्याचा प्रयत्न करू. पक्षाचा एका कार्यकर्ता या नात्याने काँग्रेस विचार घराघरात पोहचवण्याचे काम करू, असे रणजित शिरोळे यावेळी म्हणाले..


Most Popular News of this Week

मुंबईच्या महापौर रितू तावडे...

महात्मा जोतिबा फुले मंडई (पूर्वीचे क्रॉफर्ड मार्केट) हे मुंबईतील ऐतिहासिक...

KNOW YOUR ARMY EVENT INAUGURATED IN MUMBAI

The Indian Army inaugurated a three-day "Know Your Army" - Mega Equipment & Motivational Exhibition at the Colaba Military Station, Mumbai, on 29 October 2026. The event was inaugurated by Lt Gen...

एमआयडीसीतील कंपन्यांची...

 जिल्ह्याला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी रत्नागिरी...

बाह्यस्रोत आरोग्य...

 नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत मे. डी. एस. एंटरप्रायझेस यांच्या...

मुंबईतील वायू गुणवत्ता...

मुंबईतील वायू गुणवत्ता राखण्यासाठी तसेच रस्त्यांवरील धूळ आणि बांधकाम व...

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा...

 प्रमाणात कचरा साचण्याच्या संभाव्य ठिकाणांचे (Garbage Vulnerable Points – GVPs) निर्मूलन...