हैडलाइन

काँग्रेसची प्रतिमा मलिन करण्यासाठी भाजपाकडून टुलकीटचा वापर, बहिण-भावाच्या नात्यावरही घेतला आक्षेप.

राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटात होरपळून निघालेला असताना सरकारने मात्र त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. दिवाळी आली तरी सरकारची मदत काही पोहचलेली नाही, केवळ ५ हजार रुपये देऊन सरकारने शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गगणाला भिडलेल्या महागाईत ५ हजार रुपयात दिवाळी करून दाखवावी, असे आव्हान देत, हेक्टरी १ लाख रुपये देण्यास सरकार टाळाटाळ करत आहे. हे सरकार फक्त मोजक्या उद्योगपतींचे असून शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे त्यांना काहीही देणेघेणे नाही, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत टिळक भवन येथे कोकण विभागातील लोकसभा प्रभारी, जिल्हा प्रभारी, विधानसभा प्रभारी व जिल्हाध्यक्ष यांची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी यू. बी. व्यंकटेश, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील आदी उपस्थित होते.

या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने सर्व मर्यादा सोडल्या असून महिलांचा अपमान करण्यातही ते मागे नाहीत. एक व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करून काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपाने केला आहे. दिल्लीतील रामलीला मैदानावरील महारॅलीच्या वेळी बसमधील काँग्रेस खासदारांच्या एका व्हिडिओमधील काही सेकंदाचा भाग सर्व माध्यमातून प्रसारित करून काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओतील दोन्ही खासदारांचे बहिण-भावाचे नाते आहे, त्यांच्या नात्यावर संशय घेत भाजपाने महिला खासदाराचाही अपमान केला आहे. याप्रकरणी कोणाही कोणतीही तक्रार केलेली नाही पण फेक नॅरेटिव्ह पसरवण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडणाऱ्या भाजपावर मात्र काँग्रेस पक्ष कारवाई करण्यासाठी योग्य त्या यंत्रणेकडे तक्रार दाखल करेल असे सपकाळ म्हणाले..

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत गोकुळ परिवाराने त्यांच्याकडे सत्तेचा कौल दिला. एकाबाजूला सतेज पाटील व दुसऱ्या बाजूला महायुती असतानाही सतेज पाटील यांनी महायुतीचा धुव्वा उडवला. पण गोकुळ ताब्यात घेण्यासाठी पाच शासनमान्य सदस्यांची नियुक्ती करून त्यातील चौघांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. महायुती सरकारचा हा निर्णय संविधान व लोकशाही धुडकावून गोकुळवर कब्जा मिळवण्याचा डाव आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.


Most Popular News of this Week

मुंबईच्या महापौर रितू तावडे...

महात्मा जोतिबा फुले मंडई (पूर्वीचे क्रॉफर्ड मार्केट) हे मुंबईतील ऐतिहासिक...

KNOW YOUR ARMY EVENT INAUGURATED IN MUMBAI

The Indian Army inaugurated a three-day "Know Your Army" - Mega Equipment & Motivational Exhibition at the Colaba Military Station, Mumbai, on 29 October 2026. The event was inaugurated by Lt Gen...

एमआयडीसीतील कंपन्यांची...

 जिल्ह्याला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी रत्नागिरी...

बाह्यस्रोत आरोग्य...

 नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत मे. डी. एस. एंटरप्रायझेस यांच्या...

मुंबईतील वायू गुणवत्ता...

मुंबईतील वायू गुणवत्ता राखण्यासाठी तसेच रस्त्यांवरील धूळ आणि बांधकाम व...

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा...

 प्रमाणात कचरा साचण्याच्या संभाव्य ठिकाणांचे (Garbage Vulnerable Points – GVPs) निर्मूलन...