हैडलाइन

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या काव्यात्मक उद्घाटनाने कार्यक्रमाची रंगत वाढली

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त तसेच दीपावलीच्या मंगल पर्वाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य कविता स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. टिळक भवन येथे आयोजित या काव्यसोहळ्यात कवी, काव्यरसिक, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विचार, शब्द आणि भावनांचा सुंदर संगम घडवणाऱ्या या कार्यक्रमामुळे टिळक भवनमध्ये काव्यमय वातावरण निर्माण झाले.


महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. त्यांनी स्वतः कविता सादर करून या स्पर्धेचे उद्घाटन केले. त्यांच्या काव्यात्मक सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली. याप्रसंगी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजन भोसले, रमेश शेट्टी, प्रदेश सरचिटणीस शाह आलम, नामदेव चव्हाण आणि डॉ. निमिष साने यांची प्रमुख उपस्थिती होती.


या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रदेश सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांनी विशेष पुढाकार घेतला, मुंबई काँग्रेसचे सचिव प्रशांत धुमाळ यांनी आयोजनाची जबाबदारी पार पाडली. मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष भूषण पाटील, मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन, मुंबई काँग्रेसचे माजी सहखजिनदार अतुल बर्वे, राघवेंद्र शुक्ला आणि सुभाष पाखरे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.


स्पर्धेतील उत्कृष्ट काव्यरचनांची निवड परीक्षक म्हणून काम पाहणारे पत्रकार गुरुप्रसाद जाधव आणि प्राध्यापिका मनीषा रावराणे यांनी केली. प्रथम क्रमांक :रामबंधु खंडू अढांगळे, द्वितीय क्रमांक : उमेश जाधव तर तृतीय क्रमांक : कौस्तुभ शैलेश गोसावी यांना देण्यात आले तसेच उत्तेजनार्थ पारितोषिके प्रणय चव्हाण व वैष्णवी सावळे यांना देण्यात आले.


Most Popular News of this Week

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड....

 सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक...

आमदार दिलीप लांडे...

 शिवसेना आमदार दिलीप (मामा) लांडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या...

गुर्जरगौड़ ब्राह्मण समाज का...

मुंबई। गुर्जरगौड़ ब्राह्मण हितैषिणी सभा (रजि.), मुंबई द्वारा आयोजित दिवाली...

भगवान बिरसा मुंडा यांचा...

पुणे दि. १५ नोव्हेंबर -जल... जमीन आणि जंगलाशी नातं जोडून जगणाऱ्या आदिवासी...

क्रांतिकारक बिरसा मुंडा...

क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त, बृहन्मुंबई महानगरपालिका...

पंडित जवाहरलाल नेहरुंचे...

स्पर्धा आणि भांडवलशाहीच्या युगात केंद्रातील मोदी सरकार रोजगार...