शासकीय चर्मकाला विद्यालय वाचवण्यासाठी चर्मकार विकास संघ उभारणार तीव्र लढा

 शासकीय चर्मकाला विद्यालय वाचवण्यासाठी चर्मकार विकास संघ उभारणार तीव्र लढा ग्लोबल चक्र न्यूज डेस्क 

मुंबई:  स्वातंत्र्यपूर्व काळातील सन १९३८ मध्ये महाराष्ट्रातील एकमेव असलेल्या खेरवाडी, बांद्रा (पूर्व) मुंबई येथील शासकीय चर्मकला विद्यालयाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असून प्रशिक्षणा अभावी आणि अपुऱ्या कर्मच्याऱ्या मुळे तेथील संपूर्ण मशिनश गांजलेल्या अवस्थेत धूळ खात पडलेल्या आहेत असा आरोप चर्मकार विकास संघ ने एक निवेदन मार्फत करत या वर प्रशासनाने लक्ष द्यावे ही मागणी केली आहे.

चर्मकार विकास संघ ने आपल्या पत्रकात म्हटले आहे की सुमारे ५००० चौ. मी. जागा चर्मकला विद्यालयाची आहे. सदर जागेवर महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांचा डोळा आहे. 

या मंडळाने चर्मकला विद्यालयाच्या नावावरील ७×१२ उतारा आपल्या नावे करून घेतलेला आहे. ही गंभीर बाब लक्षात येताच सदर जागा वाचवून चर्मोद्योग वाचविणे काळाची गरज आहे म्हणून चर्मकार विकास संघ महाराष्ट्र राज्य महिला कार्याध्यक्षा  पूजाताई कांबळे आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष  सुभाष मराठे - निमगांवकर, प्रभाग क्रमांक १५३ चे अध्यक्ष  पुष्पराज माने आणि इतरसह तत्काळ शासकीय चर्मकला विद्यालय चे आजी माजी चर्मतज्ञ आणि अधिक्षक गोधपगारे आणि  विलास चौधरी यांची भेट घेऊन चर्मकला विद्यालयाची जागा वाचविण्यासंबधाने राज्यभर लढा तीव्र करण्याचा ईशारा दिला.
Most Popular News of this Week

International Conference on Labour and Sustainable Development in Asia:...

International Conference on Labour and Sustainable Development in Asia: Opportunities, Challenges, and Way ForwardEvent held on June 1-3, 2023 at IIPS, Mumbai,...