श्री मुतुमारी अम्मा देवीच्या वार्षिक महोत्सवात संजय दिना पाटील यांची हजेरी

श्री मुतुमारी अम्मा देवीच्या वार्षिक महोत्सवात संजय दिना पाटील यांची हजेरी

नागरीकांच्या समस्या दुर करण्याचा प्रयत्न करणार


मुंबई: श्री देवी मुतुमारी अम्मा यांच्या वार्षिक महोत्सवाची आज सांगता झाली. गेले नऊ दिवस चालु असलेला उपवास आज सोडण्यात आल्या नंतर या महाकुंभ अभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्त भव्य मिरवणुक काढण्यात आली होती. यावेळी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी या कार्यक्रमात भाग घेऊन मुतुमारी अम्मा देवीची पुजा केली. घाटकोपर येथील कामराज नगर मध्ये या वार्षिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 


श्री देवी मुतुमारी अम्माच्या वार्षिक महोत्सव व महाकुंभ अभिषेकाची विधिवत पुजा करुन त्याची सांगता करण्यात आली. घाटकोपर कामराज नगर या भागात दक्षिण भारतीयांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. त्यामुळे या ठिकाणी होणा-या या पुजेला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. गेले नऊ दिवस श्री देवी मुतुमारी अम्मा यांच्या नावाने कडक उपवास केला जातो. त्यानंतर नवव्या दिवशी तोंडात त्रिशूल तसेच पाठीत हुक लावुन वजनदार वस्तु खेचली जाते. त्यानंतर हा कार्यक्रम दिवसभर चालु असतो. सायंकाळी मुतुमारी अम्मा देवीच्या समोर उभे राहुन त्रिशुल व हुक काढले जातात. त्यानंतर उपवास सोडून या महोत्सवाची सांगता करण्यात येते. यावेळी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी या महोत्सवात भाग घेणा-या भक्तांची भेट घेतली. यावेळी संजय पाटील यांनी स्थानिक नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी ऐकुण घेतल्या. या सर्व अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन त्यांनी दिले.