हैडलाइन

भारत–श्रीलंका पायाभूत सहकार्याला चालना; संसदीय समिती बैठकीत सखोल चर्चा

 सचिवालय अंतर्गत कार्यरत गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार स्थायी समितीची महत्त्वपूर्ण बैठक नवी दिल्ली येथे पार पडली. या बैठकीत भारत आणि श्रीलंका यांच्यातील पायाभूत सुविधा विकास तसेच धोरणात्मक सहकार्य अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने सखोल चर्चा करण्यात आली.


बैठकीला समितीचे सदस्य, खा. संजय दिना पाटील, जया बच्चन तसेच समितीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्रीलंकेतील पायाभूत सुविधा व धोरणात्मक विषयांवरील संसदीय देखरेख समितीच्या १५ सदस्यीय शिष्टमंडळासोबत संयुक्त बैठक घेण्यात आली. सोमवारी सायंकाळी ४.४५ वाजता संसद भवन परिसरातील कमिटी रूम ‘C’, पीएचए येथे आयोजित या बैठकीत द्विपक्षीय सहकार्याच्या विविध विषयांवर विचारविनिमय झाला. विशेषतः पायाभूत सुविधा उभारणी, शहरी विकास, तसेच दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारी या मुद्द्यांवर भर देण्यात आला.


यावेळी बोलताना खा. संजय दिना पाटील यांनी सांगितले की, “भारत आणि श्रीलंका यांच्यातील धोरणात्मक सहकार्य वाढल्यास दोन्ही देशांतील नागरिकांना थेट लाभ होईल. पायाभूत विकासाच्या माध्यमातून आर्थिक आणि सामाजिक संबंध अधिक दृढ होतील, तसेच परस्पर विश्वास आणि वैचारिक नातेसंबंध अधिक मजबूत होतील. या बैठकीमुळे भारत–श्रीलंका संबंधांना नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त होत असून, आगामी काळात दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Most Popular News of this Week

विद्याविहार रेल्वे...

घाटकोपर परिसरातील पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील...

‘नटसम्राट’ हरपला! ज्येष्ठ...

भारतीय चित्रपटसृष्टीतील आपल्या दमदार अभिनयाने, भारदस्त आवाजाने आणि...

मंत्री छगन भुजबळ व माजी...

सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी,...

विद्याविहार ईस्ट-वेस्ट...

बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारा नवनिर्मित विद्याविहार ईस्ट-वेस्ट कनेक्टर...

वडाला में कांग्रेस ने मनाया...

मुंबई के वडाला रेलवे स्टेशन के बाहर कांग्रेस की ओर से ‘लोकतंत्र का काला...

MLA सना मलिक शेख की पहल पर भव्य...

युवाओं के रोजगार और बेहतर भविष्य को ध्यान में रखते हुए, MLA सना मलिक शेख की ओर...