हैडलाइन

महिला पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबीर

नवी मुंबई शहरात कार्यरत असलेल्या महिला पत्रकारांसाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने शनिवारी २८ मार्च रोजी नेरुळ इथल्या मीनाताई ठाकरे माता बाल रुग्णालयात विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

कुटुंबाची काळजी घेता घेता नोकरीनिमित्त वार्तांकनासाठी दिवसरात्र धावपळ करणाऱ्या महिला पत्रकांराना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. ही बाब लक्षात घेवून महिला पत्रकारांनी स्वतः पुढाकार घेत महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधून विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. 

त्यानुसार नेरूळ इथल्या मिनाताई ठाकरे माता बाल रूग्णालयात असलेल्या कर्करोग चाचणी नोंदणी विभागात पत्रकारांसाठी विशेष शिबीर घेण्यात आले. यावेळी रक्त तपासणी, रक्तातील साखरेचे प्रमाण, हिमोग्लोबीन, सिकलसेल चाचणी करण्यात आली. त्याचप्रमाणे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग याविषयीच्याही चाचण्या करण्यात आल्या. 

महिला पत्रकारांसाठी आयोजित विशेष आरोग्य शिबिराला महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत जवादे,  नेरूळ रूग्णालयाचे वैदयकीय अधिक्षक डॉक्टर उद्धव खिल्लारे,  निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास भालेराव, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ सीमा कर्पे, डॉ. हर्षदा, सहायक अधिसेविका  विद्या मानकुरे, मनिषा कळंबे, वैद्यकीय समाजसेवक अश्विनी जानकर, सिस्टर इनचार्ज शिवानी घोगरे, तरुलता मकवाना, स्टाफ नर्स सरिता भराने, पुनम कलरोड़ी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आकाश,  स्वच्छता कर्मचारी इंदुमती हातेकर, सोनाली वाघळकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या आरोग्य तपासणी शिबीराला आकाशवाणीच्या स्वप्ना हरळकर, झी चोवीस तासच्या स्वाती नाईक, जय महाराष्ट्रच्या कविता लोखंडे, फ्री प्रेस जर्नलच्या रैना असनार, टाईम्स ऑफ इंडियाच्या समीरा कपूर, दूरदर्शनच्या संध्या श्रीवास्तव,  आवाज टुडेच्या प्रिया भुजबळ, लोकशाहीच्या आकांक्षा देशमुख आदि महिला पत्रकार उपस्थित होत्या.


Most Popular News of this Week

स्वतंत्रता दिवस पर सायन...

देश अपना 80वां स्वतंत्रता दिवस मना रहा है। इसी अवसर पर सायन कोलीवाड़ा...

गोवंडी के VK English High School में...

गोवंडी स्थित VK English High School में 80वें स्वतंत्रता दिवस के अवसर पर ध्वजारोहण एवं...

मुंबई पुलिस, CWC अधिकारियों और...

मुंबई में बाल श्रम से संबंधित मामले के चलते CWC की संरक्षण व्यवस्था में रह रहे...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या...

बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत ‘मुंबई पब्लिक स्कूल, शिवाजी...

‘मेरी धारावी, मेरे...

स्वतंत्रता दिवस के मौके पर धारावी के 40 से ज्यादा स्कूलों के 1,000 से अधिक...

“तिरंगा यात्रा ५२ वर्षे ध्वज...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे प्रवक्ते महेश तपासे यांनी आज...