हैडलाइन

हिंगोलीत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांचा शिवसेनेत प्रवेश!

हिंगोली जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा राजकीय धक्का बसला आहे. कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे हिंगोली जिल्हाप्रमुख गोपी पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, माजी नगराध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल आणि अनेक माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, शाखाप्रमुख, प्रमुख पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनीही शिवसेनेचा भगवा हाती घेतला. कळमनुरीचे विद्यमान आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीत भर पडली आहे.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करताना, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांची शिवसेना ही सर्वसामान्यांच्या आणि समाजाच्या विकासासाठी काम करणारी संघटना असल्याचे सांगितले. डॉ. संतोष टारफे हे आदिवासी समाजाचे नेतृत्व करत असून, त्यांच्या माध्यमातून या समाजाच्या उन्नतीसाठी अधिक व्यापक काम करण्याची संधी मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला."तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेत आला आहात. समाजाचे काम करा, शिवसेनेचे काम करा. तुमच्या विकासकामांसाठी आणि सामाजिक उन्नतीसाठी शिवसेना कायम तुमच्या पाठीशी उभी राहील. तुम्हाला कोणतीही कमतरता भासू देणार नाही," अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली.हिंगोली जिल्ह्यातील विकासकामांचा संदर्भ देताना शिंदे यांनी आमदार संतोष बांगर यांच्या माध्यमातून यापूर्वी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याचे नमूद केले. यापुढेही या भागातील अपूर्ण विकासकामे, आवश्यक पायाभूत सुविधा आणि आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पक्षप्रवेश केलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केवळ पक्षसंघटनाच नव्हे, तर समाजाच्या विकासासाठीही सक्रियपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.


या पक्षप्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात ठाकरे गटाच्या संघटनात्मक रचनेला धक्का बसला असून, शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत माजी आमदारांसह जिल्हास्तरीय पदाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचा समावेश झाला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.यावेळी एकनाथ शिंदे यांनी लवकरच हिंगोलीत मोठा मेळावा आयोजित करण्याचे आवाहन करत, आपण स्वतः या मेळाव्याला उपस्थित राहू, असेही सांगितले. पक्षप्रवेश करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करून त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी आमदार संतोष बांगर, आमदार किशोर आप्पा पाटील, शिवसेना सचिव राम रेपाळे, सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे आणि शिवसेनेचे हिंगोलीतील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Most Popular News of this Week

मुंबईच्या महापौर रितू तावडे...

महात्मा जोतिबा फुले मंडई (पूर्वीचे क्रॉफर्ड मार्केट) हे मुंबईतील ऐतिहासिक...

KNOW YOUR ARMY EVENT INAUGURATED IN MUMBAI

The Indian Army inaugurated a three-day "Know Your Army" - Mega Equipment & Motivational Exhibition at the Colaba Military Station, Mumbai, on 29 October 2026. The event was inaugurated by Lt Gen...

एमआयडीसीतील कंपन्यांची...

 जिल्ह्याला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी रत्नागिरी...

बाह्यस्रोत आरोग्य...

 नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत मे. डी. एस. एंटरप्रायझेस यांच्या...

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा...

 प्रमाणात कचरा साचण्याच्या संभाव्य ठिकाणांचे (Garbage Vulnerable Points – GVPs) निर्मूलन...

मुंबईतील वायू गुणवत्ता...

मुंबईतील वायू गुणवत्ता राखण्यासाठी तसेच रस्त्यांवरील धूळ आणि बांधकाम व...