हैडलाइन

मुंबई मनपामध्ये 'नोट चोरी' करणारेच आज व्होट चोरीची भाषा करायला लागले

‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’च्या नावाखाली काँग्रेस, इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात फेक नॅरेटिव्ह पसरवत आहेत. १९७५ मध्ये आणीबाणी होती; तेव्हा नेते तुरुंगात, आणि माध्यमांवर बंदी होती. आज विरोधक जंतरमंतरवर आंदोलन करतात, मोर्चे काढतात, पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन करतात आणि तरी लोकशाही धोक्यात असल्याचा दावा करतात, असा घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.ठाणे शहर भाजपच्या ‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’ आंदोलनात बोलताना शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि घटनात्मक संस्थांवर संशय निर्माण करण्यावरून काँग्रेसला सुनावले. “न्यायव्यवस्थेवर दबाव आणणे, न्यायाधीशांच्या राजीनाम्याची मागणी करणे हा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान आहे,” असे ते म्हणाले.


या पदयात्रेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, वन मंत्री गणेश नाईक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, डॉ. हेमंत सावरा माजी खासदार कपिल पाटील, संजीव नाईक, आनंद परांजपे, आमदार योगेश सागर, मंदा म्हात्रे, स्नेहा दुबे-पंडित, रवींद्र फाटक, राजन नाईक, निरंजन डावखरे, विक्रांत पाटील, कुमार अयलानी, शिवाजी पाटील, नरेंद्र मेहता, प्रशांत ठाकूर, सुलभा गायकवाड, राजेश मोरे, शांताराम मोरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, शिवसेना उपनेते प्रकाश पाटील, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील आणि शिवसेना भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


राहुल गांधींच्या ‘व्होट चोरी’च्या आरोपांवरही शिंदेंनी पलटवार केला. “आरोप करा, पण पुरावे द्या. तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, हिमाचलमध्ये काँग्रेसची सरकारे आली, तीही व्होट चोरीने आली का? ईव्हीएमवर निवडून आलेल्या खासदारांनी राजीनामा देऊन व्होट चोरी सिद्ध करावी,” असे आव्हान त्यांनी दिले. २०१९ मध्ये जनतेने शिवसेना-भाजपला दिलेला जनादेश काँग्रेससोबत सत्ता स्थापून बदलण्यात आला, “खरी व्होट चोरी तेव्हा झाली,” असा टोलाही त्यांनी उबाठाला लगावला. कोविड काळात मुंबई मनपामध्ये खुलेआम नोट चोरी करणारे आज व्होट चोरीची भाषा करेल लागले असल्याची घाणघाती टीका शिंदे यांनी केली. २०१४ पूर्वीचा भारत आणि आजचा ‘नया भारत’ यांची तुलना करत शिंदे यांनी पाकिस्तानविरोधातील कारवाई, ऑपरेशन सिंदूर, दहशतवादाविरोधातील कठोर भूमिका, नक्षलवादावरील कारवाई, राम मंदिर आणि कलम ३७० हटवण्याचा उल्लेख केला. “बाळासाहेब ठाकरे असते तर मोदी-अमित शाह यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली असती,” असे ते म्हणाले.


मोदी सरकारने कोट्यवधी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढले, ८० कोटींना धान्य दिले, जनधन, लखपती दीदी, पीएम-किसान, बेटी बचाओ, स्टार्टअप, स्किल डेव्हलपमेंट, स्पोर्ट्स, रोजगाराच्या योजना राबवल्या, असा दावा त्यांनी केला. गरीबी २७.१ टक्क्यांवरून २.६ टक्क्यांवर आल्याचा जागतिक बँकेच्या अहवालाचा संदर्भही त्यांनी दिला. मोदींना ३६ देशांनी सर्वोच्च नागरी सन्मान दिला असून, आईच्या निधनानंतरही कर्तव्यावर परतणारा हा कर्मयोगी प्रधानमंत्री असल्याचे शिंदे म्हणाले. कॅप्टन स्मिथ यांनी मोदींना प्रेरणास्थान म्हटल्याचा संदर्भ देत त्यांनी विरोधकांवर टीका केली. तरुणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करू नका; त्यांना रोजगार, कौशल्य आणि संधी हव्या आहेत, असा संदेश त्यांनी दिला. “मोदी हटावचा नॅरेटिव्ह चालणार नाही. ‘फेक नॅरेटिव्ह’ आणि गोबेल नीतीला जशास तसे उत्तर द्या. महाराष्ट्रात महायुतीचा आणि देशात एनडीएचा भगवा परचम फडकत राहील,” असे आवाहन करत शिंदे यांनी २०२९ नव्हे, तर पुढील अनेक वर्षे विकासाचा वेग कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला.


Most Popular News of this Week

मुंबईच्या महापौर रितू तावडे...

महात्मा जोतिबा फुले मंडई (पूर्वीचे क्रॉफर्ड मार्केट) हे मुंबईतील ऐतिहासिक...

KNOW YOUR ARMY EVENT INAUGURATED IN MUMBAI

The Indian Army inaugurated a three-day "Know Your Army" - Mega Equipment & Motivational Exhibition at the Colaba Military Station, Mumbai, on 29 October 2026. The event was inaugurated by Lt Gen...

एमआयडीसीतील कंपन्यांची...

 जिल्ह्याला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी रत्नागिरी...

बाह्यस्रोत आरोग्य...

 नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत मे. डी. एस. एंटरप्रायझेस यांच्या...

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा...

 प्रमाणात कचरा साचण्याच्या संभाव्य ठिकाणांचे (Garbage Vulnerable Points – GVPs) निर्मूलन...

मुंबईतील वायू गुणवत्ता...

मुंबईतील वायू गुणवत्ता राखण्यासाठी तसेच रस्त्यांवरील धूळ आणि बांधकाम व...