हैडलाइन

सारण आणि मिठी नदी पुनरुज्जीवनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत समाधानी : पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

बृहन्मुंबईतील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून अभिनव उपाययोजना केल्या जात आहे. राडारोड्याचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रथमच संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रभावी व्यवस्था केली जात आहे. तथापि, मिठी नदी पुनरुज्जीवनासाठी महानगरपालिका प्रशासन प्रभावीपणे कार्य करत आहे. तसेच, मलजल प्रक्रिया केंद्रांची निर्मितीची प्रक्रिया देखील गतीने सुरू आहे. या सर्व उपाययोजना प्रभावी आणि समाधानकारक आहे, असे राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. 

 पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा, मलनि:सारण आणि मिठी नदी पुनरुज्जीवनाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यायलयात बैठक पार पडली.

मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उप आयुक्त (आयुक्त कार्यालय)  प्रशांत गायकवाड, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तसेच महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

बृहन्मुंबई क्षेत्रात (मुंबई शहर व उपनगरे) निर्माण होणाऱ्या बांधकाम आणि पाडकाम राडारोड्याचे (C & D Waste) व्यवस्थापन, वाहतूक, प्रक्रिया आणि विल्हेवाट यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘मुंबई डेब्रिज कंट्रोल अँड ट्रॅकिंग सिस्टीम’ (MDCTS) ही सुविधा कार्यान्वित केली आहे. यावर आतापर्यंत २५५ आस्थापनांनी नोंदणी केली आहे. मुंबईतील २३१ कचऱ्याच्या संवेदनशील ठिकाणांचे (GVPs) निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कचऱ्यापासून ऊर्जा (वेस्ट टू एनर्जी) निर्मितीसाठी प्रकल्प उभारले जात आहेत. मुंबईत साधारणपणे २०२८ पर्यंत सात मलजल प्रक्रिया केंद्र कार्यान्वित होतील. तसेच, मिठी नदी पुनरुज्जीवनासाठी देखील योग्यप्रकारे उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहिती यावेळी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून सादर करण्यात आली. 

त्यानंतर, पंकजा मुंडे म्हणाल्या, मुंबईतील घनकचरा व्यवस्थापन अत्यंत आव्हानात्मक कार्य आहे. कचऱ्याच्या विलगीकरणाची प्रक्रिया अधिक प्रभावी होणे आवश्यक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून याबाबत प्रभावी उपाययोजना केल्या जात आहेत. तथापि, नागरिकांनीदेखील स्वच्छता राखून आणि कचरा विलग करुनच सोपवायला हवा. राडारोडा व्यवस्थापनासाठी महानगरपालिकेने प्रभावी प्रणाली विकसित केली आहे. मलनि:सारणाच्या अनुषंगाने महानगरपालिकेने उभारलेले मलजल प्रक्रिया केंद्र (एसटीपी) नक्कीच प्रभावी आहेत. राज्य सरकारकडून राज्यातील नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी व्यवस्था निर्माण केली जात आहे. तथापि, मुंबईतील मिठी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी महानगरपालिकेकडून टप्पेनिहाय कामकाज सुरू आहे, ही समाधानकारक बाब आहे., असेही त्यांनी सांगितले. 



Most Popular News of this Week

खाकी वर्दीचा माज की कायद्याचा...

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर दिवसेंदिवस...

मुंबईच्या महापौर रितू तावडे...

मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व...

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या...

स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान, भारत रत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या...

पुणे मेट्रोच्या प्रत्येक...

पुणे दि. ३ नोव्हेंबर - आधुनिक, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक...

INDIAN NAVY SUCCESSFULLY RESCUES HIJACKED FISHING VESSEL ‘AZINI’ OFF THE...

In a swift and well-coordinated operation spanning over 48 hours, the Indian Navy successfully liberated the fishing vessel, Azini, from armed pirates. The operation culminated in the safe rescue of...

2 MAHARASHTRA NAVAL UNIT NCC SUCCESSFULLY CONCLUDES MENU 27 OPEN SEA SAILING...

The 2 Maharashtra Naval Unit National Cadet Corps, based at Ratnagiri, successfully conducted the Flag-In ceremony of the Most Enterprising Naval Unit (MENU 27) Open Sea Sailing Expedition. After...