हैडलाइन

नागपूरमध्ये ‘युवा शंखनाद’च्या माध्यमातून तरुणांचा हुंकार; राष्ट्रहित, धर्मरक्षण आणि संविधानिक मूल्यांच्या जपणुकीसाठी नितेश राणे यांचे आवाहन!

नागपूर : भारतीय जनता युवा मोर्चा, नागपूर महानगर यांच्या वतीने ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ अभियानांतर्गत आयोजित ‘युवा शंखनाद’ कार्यक्रमास मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित राहून तरुणांशी संवाद साधला. यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले की, आपल्या एकसंघ भारताकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नये, यासाठी देशाच्या संरक्षणाची आणि राष्ट्राची एकता टिकवून ठेवण्याची मोठी जबाबदारी देशातील तरुणांवर आहे. आज काही समाजकंटकांकडून देशात अराजकता निर्माण करण्याचे प्रयत्न होत असून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या मूल्यांना बाधा पोहोचविण्याचे प्रयत्न काही घटकांकडून होत आहेत. ही लढाई केवळ विचारांची नसून देशाची एकता, संविधानिक मूल्ये आणि सांस्कृतिक अस्मिता जपण्याची आहे.


देशात ‘जय श्रीराम’ म्हणण्यापासून रोखण्याचे प्रयत्न होत असतील, तर अशा प्रवृत्तींना वेळीच रोखणे आवश्यक आहे. आपण जागरूक राहिलो नाही, तर भविष्यात आपल्या धार्मिक स्वातंत्र्यावरही गदा येऊ शकते. त्यामुळे आपल्या धर्माचे, संस्कृतीचे आणि परंपरांचे रक्षण करण्यासाठी तरुणांनी संघटित, सक्षम आणि जागरूक राहावे. राष्ट्रहित आणि धर्मरक्षणासाठी युवकांनी सकारात्मक भूमिका बजावत समाजात एकजुटीचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन नितेश राणे यांनी केले. या कार्यक्रमास आमदार परिणय फुके, भाजपा नागपूर शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, नागपूरच्या महापौर सौ. ठाकरे, आमदार खोपडे, विदर्भ संघटन प्रमुख कोठेकर, माजी आमदार अनिल सोले, माजी आमदार गिरीश व्यास, आमदार पोतदार, स्थायी समिती अध्यक्ष सौ. शिवानी दाणी, भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगर अध्यक्ष सचिन करारे, महामंत्री रितेश पांडे, अथर्व त्रिवेदी, रिषभ अरखेल, कुलदीप माटे, संपर्क महामंत्री नागेश साठवणे यांच्यासह मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते उपस्थित होते.


Most Popular News of this Week

मुंबईच्या महापौर रितू तावडे...

महात्मा जोतिबा फुले मंडई (पूर्वीचे क्रॉफर्ड मार्केट) हे मुंबईतील ऐतिहासिक...

KNOW YOUR ARMY EVENT INAUGURATED IN MUMBAI

The Indian Army inaugurated a three-day "Know Your Army" - Mega Equipment & Motivational Exhibition at the Colaba Military Station, Mumbai, on 29 October 2026. The event was inaugurated by Lt Gen...

एमआयडीसीतील कंपन्यांची...

 जिल्ह्याला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी रत्नागिरी...

बाह्यस्रोत आरोग्य...

 नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत मे. डी. एस. एंटरप्रायझेस यांच्या...

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा...

 प्रमाणात कचरा साचण्याच्या संभाव्य ठिकाणांचे (Garbage Vulnerable Points – GVPs) निर्मूलन...

मुंबईतील वायू गुणवत्ता...

मुंबईतील वायू गुणवत्ता राखण्यासाठी तसेच रस्त्यांवरील धूळ आणि बांधकाम व...