हैडलाइन

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात दिवाळीनिमित्त आयोजित बचत गटांच्या प्रदर्शनातून महिलांना प्रोत्साहन


दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील महिला बचत गटांनी निर्मित केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आज (दिनांक ४ नोव्हेंबर २०२६) बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात भरविण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या जुन्या इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर आयोजित या प्रदर्शनाला महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा  मीनल तुर्डे, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे,अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा आणि संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी भेट देऊन वस्तूंची खरेदी केली. 


महानगरपालिका मुख्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यासोबतच महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभाग कार्यालयांमध्येही दिवाळीनिमित्त प्रदर्शन-विक्रीचे स्टॉल लावण्यात आले. या ठिकाणीही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासह गरजू महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागामार्फत महिला बचत गटांना प्रोत्साहन दिले जाते. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून महिला व बालकल्याण योजना तसेच दीनदयाळ अंत्योदय योजना–राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळीच्या सणानिमित्त आयोजित या प्रदर्शनामुळे महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीतून उत्पन्न मिळविण्याची संधी उपलब्ध झाली.


या प्रदर्शनात उटणे, अगरबत्ती, ज्यूट बॅग्ज, इमिटेशन ज्वेलरी, मोत्यांचे दागिने, रांगोळी, सुवासिक द्रव्ये, सुशोभित पणत्या, विविध प्रकारची आकर्षक तोरणे, आकाशकंदील आदी सजावटीच्या वस्तूंसह विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी मांडण्यात आले होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विशेष शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने व स्वहस्ते तयार केलेल्या सुंदर आणि नाविन्यपूर्ण वस्तूही या प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे आणि आत्मविश्वास वाढावा यासाठी त्यांना या प्रदर्शनात समावून घेण्यात आले.


Most Popular News of this Week

मुंबईच्या महापौर रितू तावडे...

महात्मा जोतिबा फुले मंडई (पूर्वीचे क्रॉफर्ड मार्केट) हे मुंबईतील ऐतिहासिक...

KNOW YOUR ARMY EVENT INAUGURATED IN MUMBAI

The Indian Army inaugurated a three-day "Know Your Army" - Mega Equipment & Motivational Exhibition at the Colaba Military Station, Mumbai, on 29 October 2026. The event was inaugurated by Lt Gen...

एमआयडीसीतील कंपन्यांची...

 जिल्ह्याला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी रत्नागिरी...

बाह्यस्रोत आरोग्य...

 नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत मे. डी. एस. एंटरप्रायझेस यांच्या...

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा...

 प्रमाणात कचरा साचण्याच्या संभाव्य ठिकाणांचे (Garbage Vulnerable Points – GVPs) निर्मूलन...

मुंबईतील वायू गुणवत्ता...

मुंबईतील वायू गुणवत्ता राखण्यासाठी तसेच रस्त्यांवरील धूळ आणि बांधकाम व...