हैडलाइन

सानपाड्याचे नागरिक कर भरत नाही काय? – पांडुरंग आमले


नवी मुंबई : नेरूळ नोडमध्ये महापालिका प्रशासन उद्यान व क्रिडांगणात वाढलेले जंगली गवत काढून टाकते. सानपाडा सेक्टर ७ मधील सिताराम मास्तर उद्यानातील व क्रिडांगणातील जंगली गवत काढून टाकण्यासाठी पालिका प्रशासनाकडे लेखी पाठपुरावा करूनही जंगली गवत काढले जात नाही. सानपाड्याचे नागरिक महापालिका प्रशासनाकडे कर भरत नाही काय? असा प्रश्न भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकरांना एका लेखी निवेदनातून विचारला आहे.

 सानपाडा सेक्टर ७ मधील सिताराम मास्तर उद्यानात पावसामुळे वाढलेले जंगली गवत तातडीने काढून टाकण्याची लेखी मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

सानपाडा, सेक्टर ९ मध्ये मिलेनिअम सोसायटी व नवभारत प्रेसच्या समोर महापालिकेचे सिताराम मास्तर उद्यान आहे. या उद्यानात सानपाडा कॉलनीतील रहिवाशी या उद्यानात चालण्यासाठी व फिरण्यासाठी येत असतात. सानपाडा, नेरूळ, जुईनगर, तुर्भे परिसरातील हे मोठे व विस्तिर्ण उद्यान व क्रिडांगण आहे. मैदानावर पावसामुळे जंगली गवत वाढल्याने मुलांना मैदानावर खेळण्यासाठी येणे शक्य नाही. त्यामुळे मुले घरात मोबाईलवर गेम, टीव्ही नाहीतर संगणकावर कार्यरत असतात. आपण जर तातडीने हे गवत काढले तर मुलांना क्रिकेट, फुटबॉल खेळणे शक्य होईल. नेरूळ सेक्टर ४ मधील क्रिडांगणाची पालिका प्रशासनाने रविवारी सफाई केली आहे. नेरूळची क्रिडांगणावरील जंगली गवत पालिका प्रशासन काडू शकते, तर सानपाडा सेक्टर ७ मधील सिताराम मास्तर उद्यानातील जंगली गवत का काढले जात नाही? सानपाडावासी कराचा भरणा करत नाही काय? अडीच महिने पडत असलेल्या पावसामुळे या उद्यान व क्रिडांगणात जंगली गवत मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या रहीवाशांना डासांचा व चिलटांचा त्रास सहन करावा लागत आहे. समस्येचे गांभीर्य पाहता आपण संबंधितांना उद्यानात व क्रिडांगणात पावसामुळे वाढलेले जंगली गवत काढण्याचे निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.


Most Popular News of this Week

बेलापुर में प्रस्तावित...

बेलापुर में प्रस्तावित अस्पताल को खेल का मैदान देने का फोर्टी प्लस क्रिकेट...

तुर्भे विभाग की सड़कें गड्ढे...

तुर्भे विभाग की सड़कें गड्ढे में, नागरिको में आक्रोशनवी मुंबई। पिछले कुछ...

चोरी-गुम हुए 82 मोबाइल फोन मूल...

चोरी-गुम हुए 82 मोबाइल फोन मूल मालिकों को लौटाया गया,वरिष्ठों द्वारा खारघर...

भाजपा जिला अध्यक्ष जनसंपर्क...

भाजपा जिला अध्यक्ष जनसंपर्क कार्यालय का बेलापुर में...

सीसीटीवी में दिखे कोयता लेकर...

सीसीटीवी में दिखे कोयता लेकर घूमने वाले चोरपनवेल। नवी मुंबई पुलिस के...

परियोजना पीड़ितों के आवश्यक...

परियोजना पीड़ितों के आवश्यक निर्माणों को नियमित करने की कार्यवाही की...